Join us

CoronaVirus News: आठ कंत्राटी कामगारांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 1:10 AM

मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील प्रकार : अन्य कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची सेवाशुश्रुषा करणाºया ८ कंत्राटी कामगारांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील हा प्रकार असून त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.जीवघेण्या वातावरणात काम करताना क्षयरोग अन्यथा कोरोनाच्या रूपात मृत्यू कंत्राटी कामगारांचा घात करण्याची भीती त्यांना सतावत असल्याने ‘आजार आमचा घात करेल, कुटुंबीयांचे काय?’ या मथळ्याखाली २० मे रोजी ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध करत या ठिकाणची परिस्थिती मांडली होती. मात्र सरकारने अजूनही याबाबत कोणतीच ठोस पावले उचलली नाहीत. परिणामी आठ कर्मचाºयांना कोरोना आजाराची लागण झाली. मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेचे ५०० कंत्राटी कामगार आज कोरोनासदृश धोका असलेल्या क्षयाच्या रुग्णांची सेवासुश्रुषा करत आहेत. मात्र कोरोनाशी दोन हात करताना त्यांना पीपीई किट हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझर, मास्क, महागाई भत्ता/ जोखीम भत्ता, लांबून येणाºयांसाठी जेवण व राहण्याची सोय अशी कोणतीही सुविधा अजूनही दिली गेली नाही. तरीही कोणत्याही प्रकारची तक्रार न करता गेल्या २० ते २२ वर्षांपासून ते अविरत सेवा देणाºया कामगारांच्या जीवावर बेतले असल्याने निदान आता तरी सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कामगारांकडून केली जात आहे.कामगारांच्या न्यायासाठी लढतोयआमच्या आठ कंत्राटी कर्मचाºयांना सेवा बजावत असताना कोरोनाची लागण झाली आहे. तर चौघे क्षयरोगाने पीडित आहेत. त्यामुळे भारतीय सफाई मजदूर संघटनाअंतर्गत, मुंबईचे सरचिटणीस शशांक बांदकर आणि मी कामगारांना न्याय मिळावा यासाठी लढत आहोत.- संदीप खरात, अध्यक्ष,अखिल भारतीय सफाई मजदूर संघ अंतर्गत,मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या