Join us

CoronaVirus News: दैनंदिन रुग्ण व मृत्यूंत कमालीची घट; मुंबईत केवळ एक प्रतिबंधित क्षेत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 10:07 AM

मुंबईत दिवसभरात ३७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ७ लाख १५ हजार ३८९ रुग्णांनी कोविडला हरविले आहे. शहर उपनगरात बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के आहे.

मुंबई : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे स्पष्ट दिसून येत आहे मागील काही दिवसांत दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूसंख्येत कमालीची घट झाली आहे. शहर उपनगरात दिवसभरात २०८ रुग्ण आणि ३ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या ३ हजार ९६१ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.मुंबईत दिवसभरात ३७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ७ लाख १५ हजार ३८९ रुग्णांनी कोविडला हरविले आहे. शहर उपनगरात बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के आहे. २ ते ८ आगस्ट पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०४ टक्के आहे, तर रुग्ण दुप्पटीचा काळ १ हजार ६८० दिवसांवर येऊन ठेपला आहे.दिवसभरात कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी २६ हजार ४४५ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण ८४ लाख ३९ हजार ५२१ कोरोना चाचण्या कऱण्यात आल्या आहेत. येथे २०० हून अधिक सक्रिय अंधेरी पश्चिम, बोरिवली पश्चिम, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे पश्चिम, मुलुंड, उत्तर मुंबईतील भांडुप आणि दक्षिण मुंबईतील मलबार हिल हे प्रभाग आहेत जिथे प्रत्येकी 200 पेक्षा जास्त सक्रिय कोविड रुग्ण आहेत.  सर्वाधिक सक्रिय रुग्ण के पश्चिम वॉर्डमधील अंधेरी पश्चिम येथे नोंदले गेले आहे. सध्या 328 सक्रिय रुग्ण अंधेरी या परिसरात आहेत. त्यानंतर कांदिवली पश्चिमशी संबंधित आर-दक्षिण वॉर्डमध्ये 303 आणि बोरिवली पश्चिमशी संबंधित आर-मध्य वॉर्डमध्ये 286 सक्रिय रुग्ण आहेत. या विभागांत चिंता कायम१७ विभागांत रुग्ण वाढीचा दर मुंबईच्या एकूण कोविड रुग्णांच्या सरासरी वाढीच्या दरापेक्षा जास्त असून ०.०४ टक्के एवढा आहे. बी वॉर्डचा सर्वात कमी रुग्ण वाढीचा दर ०.०१ टक्के आहे, तर चर्चगेट, कुलाबा आणि कफ परेड असे परिसर येणाऱ्या दक्षिण मुंबईतील ए वॉर्डमध्ये सर्वाधिक रुग्ण वाढीचा दर असून ०.०७ टक्के एवढा आहे. सात दिवसांमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे वाढीचा दर मोजला जातो. ए वॉर्डमध्ये सध्या एकूण १४४ सक्रिय रुग्ण आहेत.४७५ रुग्ण गंभीरमुंबईत सक्रिय रुग्णांपैकी १ हजार ३९४ रुग्ण लक्षणविरहित आहेत, तर २ हजार २६२ रुग्णांमध्ये मध्यम, सौम्य लक्षणे आहेत. या रुग्णांचे प्रमाण अनुक्रमे ३४ आणि ५५ टक्के आहे. ४७५ गंभीर रुग्ण आहेत, या रुग्णांचे प्रमाण ११ टक्के आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या