CoronaVirus News: बंगल्यावर टेलिफोन ऑपरेटर आढळला होता पॉझिटिव्ह, अखेर थोरातांचा चाचणी अहवाल आला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 02:07 PM2020-07-09T14:07:12+5:302020-07-09T14:13:28+5:30
CoronaVirus News: रात्री उशिरा चाचणीचे अहवाल प्राप्त झाले, त्यात बाळासाहेब थोरात यांना दिलासा मिळाला असून, त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून देशासह राज्यात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. सामान्यांपासून ते ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांनाही याआधी कोरोनाची लागण झाली होती. विशेष म्हणजे ठाकरे सरकारमधील महसूलमंत्री असलेल्या बाळासाहेब थोरातांच्या बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे बाळासाहेब थोरात क्वारंटाइन झाले होते. तसेच त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती सतावत होती. त्यानंतर त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली होती. रात्री उशिरा चाचणीचे अहवाल प्राप्त झाले, त्यात बाळासाहेब थोरात यांना दिलासा मिळाला असून, त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीसुद्धा होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली होती, तसेच ती चाचणी निगेटिव्हही आली होती, मात्र खबरदारी म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांनी होम क्वारंटाइन व्हायचे ठरवले, अशी माहिती त्यांनीच ट्विटरवरून दिली आहे.
तत्पूर्वी २५ मे रोजी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अशोक चव्हाण यांना २६ मे रोजी तातडीने मुंबईला हलविण्यात आले होते. तेथे उपचारानंतर ४ जून रोजी ते कोरोनामुक्त झाले. त्यानंतर काही दिवस काही दिवस मुंबईतच घरी आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. चव्हाण यांच्याआधी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची बाधा झाली होती. सुरुवातीला आव्हाड यांनी कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर ठाण्यातल्या रुग्णालयात उपचार झाले. आव्हाड यांच्या संपर्कात आलेल्या काही सुरक्षा कर्मचाऱ्यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांपूर्वीच आव्हाड कोरोनावर मात करून घरी परतले.
हेही वाचा
काशीवर आई अन्नपूर्णा अन् बाबा विश्वनाथांचा आशीर्वाद, भारताचे प्रमुख निर्यात केंद्र बनवणार- मोदी
Whatsapp, Facebook, Instagram एकत्र येणार?; लवकरच घोषणा होण्याची शक्यता
मोठी बातमी; आता कागदपत्रांशिवाय PFमधून पैसे काढता येणार; नोकरदारांचं टेन्शनच संपणार
VIDEO : ...अन् तो पोलिसांसमोर ओरडला, "मैं ही हूँ विकास दुबे कानपूर वाला"
नियम बदलले! फक्त ७ रुपये गुंतवून मिळवा ६० हजारांची पेन्शन; २.२८ कोटी लोकांना फायदा
मोठी बातमी! आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणाऱ्या गँगस्टर विकास दुबेला अटक
रेल्वेचं खासगीकरण होणार नाही, पीयूष गोयल यांची मोठी घोषणा
तैवान, जपाननंतर आता व्हिएतनामला चिथावतोय चीन; वादग्रस्त भागात पाठवल्या युद्धनौका