CoronaVirus News : ‘सम आणि विषम’मुळे होणाऱ्या वादांवर फुलस्टॉप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 01:41 AM2020-06-24T01:41:42+5:302020-06-24T01:41:55+5:30
उत्तर मुंबईच्या कंटेन्मेंट झोन किंवा रेड झोनमध्ये महापालिका आणि पोलिसांकडून ‘संपूर्ण लॉकडाऊन’ घोषित करण्यात आला आहे.
मुंबई : उत्तर मुंबईच्या कंटेन्मेंट झोन किंवा रेड झोनमध्ये महापालिका आणि पोलिसांकडून ‘संपूर्ण लॉकडाऊन’ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे ‘सम आणि विषम’मुळे होणाºया खटपटी बºयाच प्रमाणात कमी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
लोकांच्या सोयीसाठी सरकारने लॉकडाऊन शिथिल करताना ‘सम आणि विषम’चा पर्याय दिला होता. मात्र याचा नेमका अर्थ काय हेच बºयाच लोकांना समजत नसल्याने ‘उसका दुकान खुला है तो मेरा क्यो बंद करू?’ असे सवाल पोलिसांना विचारत हुज्जत घातली जात होती. ‘तुम्ही कंटेन्मेंट किंवा रेड झोनमध्ये दुकान उघडण्याची परवानगीच कशी देता?’ असाही सवाल नागरिकांकडून विचारला जात होता. कारण दुकानात खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होऊन ‘फिजिकल डिस्टन्स’चे नियम पायदळी तुडवले जात होते.
अखेर या परिसरात ‘संपूर्ण लॉकडाऊन’ घोषित झाल्याने बºयाच प्रमाणात हे वाद कमी होऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश मिळत आहे. दहिसर पूर्वच्या केतकीपाडा, काजूपाडा तर पश्चिमेला गणपत पाटील नगर, कांदिवलीच्या समतानगर पोलिसांच्या हद्दीतील नऊ कंटेन्मेंट झोन, मालाड पूर्वमध्ये कोकणीपाडा, तानाजीनगर, शिवाजीनगर, क्रांतीनगर, आप्पापाडा, पिंपरीपाडा, दिंडोशी, संतोषनगर, पुष्पा पार्क, धनजीवाडी, कासमबाग आणि मकरानी पाडा, तर पश्चिमेला मोडणाºया मढ, एमएचबी कॉलनी, राठोडी या परिसरात पालिकेकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
या ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणतीच दुकाने अथवा आस्थापने उघडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. स्थानिकांकडूनही नियम न मोडण्याची काळजी घेतली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येतेय.