CoronaVirus News : ‘पुन:श्च हरिओम’मध्ये ‘बेस्ट’च ठरत आहे बेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 01:40 AM2020-06-24T01:40:02+5:302020-06-24T01:40:33+5:30
गेल्या आठवड्यापासून अत्यावश्यक कर्मचाºयांसाठी रेल्वे सेवा सुरू झाली तरी अद्यापही बेस्टलाच प्रवाशांची पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई : आर्थिक अडचण, बाधित कर्मचाऱ्यांची वाढती संख्या आणि संसर्गाचा धोका असतानाही मुंबईकरांसाठी दररोज रस्त्यावर धावणारी बेस्ट उपक्रम सेवा पुन्हा एकदा बेस्ट ठरली आहे. लोक डाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्ट उपक्रमाने दिलासा दिला होता. तर 'मिशन बिगीन अगेन'चा भारही या सार्वजनिक उपक्रमाने उचलला. गेल्या आठवड्यापासून अत्यावश्यक कर्मचाºयांसाठी रेल्वे सेवा सुरू झाली तरी अद्यापही बेस्टलाच प्रवाशांची पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मुंबईत २४ मार्चपासून लॉक डाऊन करण्यात आले. मात्र या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी ' बेस्ट ' सेवा धावून आली. रेल्वे सेवा बंद असल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी बेस्ट उपक्रमावर होती. या काळात बस चालक आणि वाहकांना कोरोनाचा संसर्ग झाला.
आतापर्यंत बेस्ट उपक्रमाचे सुमारे पाचशे कर्मचारी बाधित झाले असून ५८ कर्मचाºयांचा मृत्यू झाला असल्याचा दावा कामगार संघटनांकडून केला जात आहे.३ जूनपासून 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत मुंबई हळूहळू पूर्वपदावर येत आहे. खाजगी व सरकारी कार्यालय मर्यादित कर्मचारी संख्येने सुरू झाले आहेत.
तसेच दुकानं, मंडई सम - विषम पद्धतीने सुरू आहेत. त्यामुळे या प्रवाशांचा भार बेस्ट उपक्रमावर आहे. लॉक डाऊन पूर्वी बेस्ट उपक्रमाच्या बस गाड्यांमधून दररोज सुमारे ३२ लाख प्रवाशी प्रवास करीत होते.
मुंबईतील व्यवहार टप्याटप्याने सुरू होत असताना बेस्ट प्रवाशी संख्याही वाढू लागली आहे. गेल्या आठवड्यात १९ जून रोजी साडेपाच लाख प्रवाशांनी बेस्ट बसने प्रवास केला. दोन दिवसांत यामध्ये वाढ होत सोमवारी सात लाख ७८ हजार प्रवाशांनी प्रवास केला.
>प्रमुख कार्यालयांसाठीही सेवा सुरू होणार
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे आता बेस्ट उपक्रमानेही फिडर मार्गांवर बस सेवा सुरू केल्या आहेत. तसेच अनेक सरकारी - खाजगी कार्यालये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, कुर्ला आणि दादर अशा प्रमुख स्थानकांवरून कार्यालयापर्यंत बस सेवा सुरू करण्यात येत आहेत.
यासाठी कोणत्या रेल्वे स्थानकांवर दररोज किती प्रवाशी ये - जा करतात, याची माहिती घेण्यात येत आहे. एकदा प्रवाशांचा अंदाज आल्यास बस मार्गांचे नियोजन करणे शक्य होईल.
गेल्या आठवड्यात प्रवाशी संख्या - साडेपाच लाख
२३ जून रोजी प्रवाशी संख्या - सात लाख
७८ हजार ३३६
उत्पन्न - ७३ लाख
५२ हजार ५६५ फिडर मार्गांवर जादा बस गाड्या.