CoronaVirus News : राज्यांतर्गत एसटी सेवेबाबत सरकारचा यू-टर्न; आगाराबाहेर गर्दी अन् नागरिकांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 12:00 PM2020-05-11T12:00:01+5:302020-05-11T12:02:45+5:30

मुंबई सेंट्रल येथील आगाराबाहेर गर्दी केलेल्या नागरिकांना हटविण्यासाठी पोलिसांना बोलाविण्यात आले. 

CoronaVirus News : Government's U-turn on inter-state ST service; citizens outside the depot vrd | CoronaVirus News : राज्यांतर्गत एसटी सेवेबाबत सरकारचा यू-टर्न; आगाराबाहेर गर्दी अन् नागरिकांमध्ये संताप

CoronaVirus News : राज्यांतर्गत एसटी सेवेबाबत सरकारचा यू-टर्न; आगाराबाहेर गर्दी अन् नागरिकांमध्ये संताप

Next

मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यातील अडकलेल्या नागरिकांना आपल्या मूळगावी जायचे होते. यासाठी सरकारद्वारे एसटीची मोफत सेवेची घोषणा केली. मात्र फक्त इतर राज्यातील अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत आणि इतर राज्यात अडकलेले जे महाराष्ट्राच्या सीमेवर आले आहेत. त्यांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यासाठीच एसटीची मोफत बस सेवा उपलब्ध राहणार आहे, असा निर्णय बदलल्याने राज्यातील नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. सोमवारी राज्यभरातील एसटी डेपो बाहेर गर्दी जमा  झाली होती. मुंबई सेंट्रल येथील आगाराबाहेर गर्दी केलेल्या नागरिकांना हटविण्यासाठी पोलिसांना बोलाविण्यात आले. 

राज्यातील विविध भागात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नागरिकांनी राज्यातील प्रत्येक एसटी आगाराबाहेर गर्दी केली आहे. मुंबई सेंट्रल आगाराबाहेर राज्यातील मूळगावी जाणाऱ्या नागरिकांनी सर्व कागदपत्रे घेऊन गर्दी केली आहे. लॉकडाऊनमध्ये राज्यातील विविध भागात अडकलेल्या विद्यार्थी, मजूर, नागरिकांना घरी पोहोचविण्यासाठी एसटी महामंडळाकडून ११ मे रोजीपासून मोफत बस सुरू होणार, राज्यभरात अडकलेल्या नागरिकांसाठी एसटीची मोफत सेवा मिळणार, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी ९ मे रोजी केली होती.  त्यानुसार मुंबई राहणारे विद्यार्थी, मजूर यांनी  आगार,  बस  डेपोकडे वाट धरली. आरोग्य प्रमाणपत्र, पोलीस परवानगी मिळविण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र निर्णय बदलण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 
------------
फिजिकल डिस्टन्सचा फज्जा 
राज्यांतर्गत एसटी चालविण्याचा निर्णय सरकारने मागे घेतल्याने मुंबई सेंट्रल येथे जमा झालेल्या गर्दीमध्ये फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडालेला आहे. 
-----------------------------
ऑनलाईन पोर्टलदेखील धिम्यागतीवर एसटी महामंडळाने ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. या पोर्टल मार्फत अर्जदार एकटा किंवा दोन ते तीन व्यक्तींचा छोटा गट असला,  तरीही त्याची नोंद करणे सहज शक्य होणार आहे. मात्र हे पोर्टल धिम्यागतीने चालत आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News :आम्ही उद्ध्वस्त झालोय, मदत करा; इम्रान खान यांच्या अर्थ सल्लागाराची कबुली

Lockdown News: "शहरातील 'त्यांना' बाहेरचे समजतात अन् गावात कोरोनाच्या भीतीनं प्रवेश मिळत नाही"

"आताचं संकट मोदींना झेपणारं नाही; त्यांनी सर्वपक्षीय सरकार स्थापन करावं"

Lockdown News: आजपासून ५ दिवसांसाठी मोदी सरकारची योजना; घरबसल्या करा स्वस्तात सोनं खरेदी!

पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?

गिलगिट-बाल्टिस्‍तानवर भारताच्या 'मास्‍टरस्‍ट्रोक'ला सिक्कीममधील संघर्षातून चिनी उत्तर, तज्ज्ञांचा दावा

ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज

Coronavirus: येत्या ३० दिवसांत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या साडेपाच लाखांपर्यंत पोहचू शकते – रिपोर्ट

Web Title: CoronaVirus News : Government's U-turn on inter-state ST service; citizens outside the depot vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.