CoronaVirus News: हुश्श... भय इथले संपत आहे..!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 03:12 AM2020-05-02T03:12:23+5:302020-05-02T06:44:05+5:30

वेळीच भारतात परतलो असतो तर बरं झालं असतं, असा विचारही अनेकांच्या मनात येत होता. मात्र, सुदैवाने कोरोनाचा प्रकोपासह आम्हा भारतीयांच्या मनातले भयही हळहळू ओसरू लागले आहे.

CoronaVirus News: Heartbreaking situation in Italy experiencing the throes of death | CoronaVirus News: हुश्श... भय इथले संपत आहे..!

CoronaVirus News: हुश्श... भय इथले संपत आहे..!

Next

संदीप शिंदे
मुंबई : दर दिवशी ८०० ते ९०० रुग्णांचा बळी जात होता. घरासमोरून रोज किमान पाच ते सहा अ‍ॅम्ब्युलन्स सायरन वाजवत जायच्या. मृतांचा दफन विधी शक्य नसल्याने विद्युत दाहिन्या सुरू झाल्या. त्या २४ तास धगधगत असायच्या. त्यासाठी आर्मीच्या जवानांना पाचारण केलं होतं. मृत्यूचं थैमानच सुरू होतं. प्रत्येक जण भयभीत होता. वेळीच भारतात परतलो असतो तर बरं झालं असतं, असा विचारही अनेकांच्या मनात येत होता. मात्र, सुदैवाने कोरोनाचा प्रकोपासह आम्हा भारतीयांच्या मनातले भयही हळहळू ओसरू लागले आहे. इटलीत वास्तव्याला असलेले डॉ. प्रवीण जगदाळे आपल्या भावना ‘लोकमत’कडे मांडत होते.
पर्यटन, फॅशन, खाद्य संस्कृती आणि चामड्याच्या वस्तूंचा समृद्ध वारसा इटलीला लाभला आहे. त्यामुळे जगभरातील प्रवाशांची वर्षभर ये-जा असते. त्यात चीनी पर्यटकांची संख्या जास्त असते. १४ फेब्रुवारीपर्यंत सारं काही सुरळीत सुरू होतं. मात्र, लोंबार्डी भागात कोरोनाचे रुग्ण सापडले आणि सारं चित्रच बदललं. गावापाठोपाठ, प्रांत, राज्य आणि मग देशाच लाँकडाऊन झाला. आजवर दुर्दैवाने २७ हजार बळी गेले. त्यात ८० टक्के रुग्ण वयोवृद्ध होते. काही दिवस तर तरुण रुग्णांचा जीव वाचविण्यास प्राधान्य
दिले जात होते. रुग्णसंख्या दोन
लाखांच्या पुढे झेपावल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण होता. परंतु, आता सुदैवाने रूग्ण आणि बळींची संख्या
७० टक्क्यांनी कमी झाली आहे.
उद्योग आणि बिझनेस हब असलेल्या मिलान आणि तोरीना भागात सर्वाधिक
रूग्ण आहेत. उत्तर इटलीत कोरोनाचे थैमान सुरू असताना त्याचा दक्षिण इटलीतील प्रसार मर्यादित राहिला हे सुदैवच. लॉकडाऊनच्या निर्बंधांचे काटेकोर पालन केल्याचा परिणाम. जीव धोक्यात टाकून कर्तव्य बजावणारे वैद्यकीय कर्मचारी व पोलीस यंत्रणेला अभुतपूर्व सहकार्य जनतेने केले. अडचणीच्या काळात भारतीय इटलीयन असा भेदभाव न करता प्रत्येक
जण एकमेकांना मानसिक आधार देत
होते. त्यामुळेच करोनाच्या संकटावर आपण आता मात करू शकतो हा विश्वास प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला. कोरोनामुळे कोसळलेली अर्थव्यवस्था टप्प्याटप्याने पूर्वपदावर येईल. परंतु, पर्यटनाचे सुवर्णयुग पुन्हा अवतरण्यास
बरेच महिने लागतील, अशी खंत
जगदाळे यांनी व्यक्त केली.
> चीनी पर्यटकांबद्दल संशय
‘वूई आर चायनीज, नॉट अ व्हायरस’ असे फलक घेऊन फ्रोरीन्स, व्हेनीस यांसारख्या शहरांत काही चीनी पर्यटक जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात उभे होते. आम्हाला मिठी मारा या त्यांच्या आवाहनाला अनेकांनी प्रतिसादही दिला. त्यांनी जाणिवपूर्व कोरोनाचा प्रसार केल्याचा संशय इथे व्यक्त केला जातो. मात्र, त्याला ठोस आधार नसल्याचे जगदाळे म्हणाले.
देशात न परतण्याचा निर्णय योग्य
कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यानंतर इथे वास्तव्याला असलेल्या काही भारतीय विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. त्यांना एअरलिफ्ट करून पुढे भारतात पाठविण्यात आले. परंतु कुटुंबासह वास्तव्याला असलेल्या बहुसंख्य भारतीयांनी इथेच राहण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आम्ही अनेकांची समजूत काढली. प्रवासात कोरोनाचा प्रादुर्भाव होईल आणि भारतीयांचा जीवही आपण धोक्यात टाकू, अशी भीती त्यामागे होती. तो निर्णय योग्यच ठरला, याचे जगदाळे यांना समाधान वाटत आहे.
>दंड आणि आर्थिक आधार
सबळ कारणाखेरीज घरापासून एक किमीपेक्षा जास्त लांब जाण्याची परवानगी नाही. लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्यांना तीन ते पाच हजार युरो (सुमारे अडीच ते चार लाख रुपये) तर, नियम पाळत बिनकामाचे बाहेर भटकणाऱ्यांनाही ३०० ते ५०० युरो दंड होतो.
आर्थिक अरिष्ट कोसळलेल्या व्यक्तींना सोशल सिक्यूरीटीअंतर्गत ६०० ते १२०० युरोपर्यंतची आर्थिक मदतही सरकार करत आहे.

Web Title: CoronaVirus News: Heartbreaking situation in Italy experiencing the throes of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.