CoronaVirus News: कोरोनाला घराघरात जाऊन हरविणारे दवाखाने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 02:13 AM2020-07-20T02:13:48+5:302020-07-20T02:14:04+5:30

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आतापर्यंत ५ लाख ३८ हजारपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली आहे.

CoronaVirus News: Hospitals that lose corona from house to house | CoronaVirus News: कोरोनाला घराघरात जाऊन हरविणारे दवाखाने

CoronaVirus News: कोरोनाला घराघरात जाऊन हरविणारे दवाखाने

Next

मुंबई : फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून हॉटस्पॉट भागांमध्ये शीघ्र कृती उपक्रम अशा प्रयत्नांतून महानगरपालिका प्रशासनाने कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आणली आहे. विशेषत: धारावीसारखा परिसर एक वेळ हॉटस्पॉट म्हणून गणला जात होता, तिथे आता रुग्णांची संख्या कमी होत आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आतापर्यंत ५ लाख ३८ हजारपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली आहे. विविध परिसरांमध्ये ४४३ फिवर क्लिनिकच्या माध्यमातून तपासणी शिबिर घेऊन बाधितांचा शोध घेतला आहे. संसर्गावर नियंत्रण, ही बाब केंद्रस्थानी ठेवत महानगरपालिका प्रशासनाने अर्ध्या तासात निदान करू शकणारे अँटिजेन टेस्ट युद्धपातळीवर खरेदी करून कोरोना चाचण्यांना अधिक वेग दिला आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या निर्देशांचे योग्य पालन करून प्रशासनाने चाचण्या केल्या असून, सुमारे १ लाख अँटिजेन टेस्ट यामुळे होत आहेत. खासगी प्रयोगशाळांना डॉक्टरांच्या लिखित सल्ल्याशिवाय म्हणजेच प्रिस्क्रिप्शनशिवाय कोविडविषयक वैद्यकीय चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

३ जुलैपासून अँटिजेन टेस्टचा उपयोग करण्यात येत असल्याने आता दैनंदिन चाचण्यांची संख्याही ५ हजार ५०० पर्यंत पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी असलेली दैनंदिन सरासरी ४ हजार चाचण्यांची संख्या आता वाढली आहे. बाधितांच्या कमी-अधिक संपर्कात असलेल्या अशा सुमारे १६ लाखांहून अधिक व्यक्तींचा आतापर्यंत शोध (कॉण्टॅक्ट ट्रेसिंग) घेण्यात आला आहे. यातील सुमारे १३ लाख ४४ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींनी अलगीकरण (क्वारंटाइन) पूर्ण केले आहे.

३ फेब्रुवारी रोजी मुंबईत पहिली कोरोना चाचणी करण्यात आली.
११ मार्च रोजी पहिला कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळला.
३ फेब्रुवारी ते ६ मे या कालावधीमध्ये मुंबईत १ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला.
१ जून रोजी २ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला.
२४ जून रोजी ३ लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला.
८ जुलैपर्यंत एकूण ३ लाख ६४ हजार ७५३ चाचण्या झाल्या.
च्रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता ५४ दिवसांवर पोहोचला.
च्मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता १.३० टक्के असा झाला.
च्आर मध्य विभाग वगळता इतर सर्व विभागांतील रुग्णवाढीचा सरासरी दर २ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
च्एकूण २४ विभागांपैकी १५ विभागांत हा सरासरी दर १.३० टक्के किंवा त्यापेक्षाही कमी आहे.
५ विभागात १ टक्केपेक्षा कमी आहे.
च्आर मध्यमध्ये हा सरासरी दर २.५ टक्के असा आहे.

Web Title: CoronaVirus News: Hospitals that lose corona from house to house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.