CoronaVirus News : दोन मजल्यांवर दहापेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडल्यास इमारत सील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 02:48 AM2020-09-17T02:48:30+5:302020-09-17T02:48:51+5:30

मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरुवातीच्या काळात एक रुग्ण सापडला तरी संपूर्ण इमारत सील केली जात होती. मात्र कालांतराने त्यात सुधारणा करीत केवळ बाधित मजलाच सील करण्यात येत होता.

CoronaVirus News: If more than ten Corona patients are found on two floors, the building will be sealed | CoronaVirus News : दोन मजल्यांवर दहापेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडल्यास इमारत सील

CoronaVirus News : दोन मजल्यांवर दहापेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडल्यास इमारत सील

Next

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मुंबईत वाढत असून, बहुतांश रुग्ण इमारतींमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रतिबंधित इमारतीसंदर्भात सुधारित परिपत्रक काढले आहे. त्यानुसार एखाद्या इमारतीत दहापेक्षा अधिक रहिवाशांना कोरोना झाल्यास किंवा दोन व त्यापेक्षा अधिक मजल्यांवर बाधित रुग्ण आढळल्यास संबंधित इमारत सील करण्यात येईल.
मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरुवातीच्या काळात एक रुग्ण सापडला तरी संपूर्ण इमारत सील केली जात होती. मात्र कालांतराने त्यात सुधारणा करीत केवळ बाधित मजलाच सील करण्यात येत होता. १ सप्टेंबरपासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला. विशेषत: पश्चिम उपनगरात ७० टक्के रुग्ण इमारतींमधील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा कडक नियम जारी केले आहेत.
यासंदर्भात मंगळवारी झालेल्या प्रशासकीय बैठकीत, बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर संबंधित इमारतीतील परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण इमारत अथवा काही भाग सील करावा? याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक विभागाचे साहाय्यक आयुक्त किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आला
आहे.

‘त्या’ व्यक्तींच्या हातावर मारणार शिक्के
अनेक ठिकाणी बाधित रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे प्रादुर्भाव वाढत असल्याने बाधित इमारतीमधील हाय रिस्क गटातील लोकांचा शोध घेऊन त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात येईल.
संपूर्ण इमारत अथवा काही भाग सील केल्यानंतर तेथील व्यवस्थापनाची जबाबदारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर असेल. सोसायटीची व्यवस्थापकीय समिती आणि सदस्यांना नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
सील इमारतींमध्ये खासगी सुरक्षारक्षक तैनात करावा, घरकाम करणारे, भाजी-फळ विक्रेते आदींना संबंधित इमारतीत प्रवेश देऊ नये. तसेच कोरोनाची लक्षणे असणाºया बाधितांना पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल होणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Web Title: CoronaVirus News: If more than ten Corona patients are found on two floors, the building will be sealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.