CoronaVirus News : मुंबईतून कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना स्टॅम्पमुळे संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 01:07 AM2020-05-18T01:07:57+5:302020-05-18T07:03:17+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : हातावर मारण्यात येणाºया या स्टॅम्पसाठी नेमकी कसली शाई वापरली जात आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षेची कुठलीही काळजी घेतली जात नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे.

CoronaVirus News : Infection caused by stamps to employees leaving Mumbai for Konkan | CoronaVirus News : मुंबईतून कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना स्टॅम्पमुळे संसर्ग

CoronaVirus News : मुंबईतून कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना स्टॅम्पमुळे संसर्ग

Next

मुंबई : यंदा कोरोनामुळे लॉकडाउनमध्ये काही चाकरमान्यांनी ई-पास व इतर सोपस्कार पूर्ण करत गावची वाट धरली आहे. काही दिवसांपासून वाहनांतून मुंबईकर कोकणात रवाना होत आहेत. मात्र, खारेपाटण या सिंधुदुर्गच्या सीमेवर तपासणीसाठी वाहने व प्रवाशांच्या लांब रांगा लागल्या असून, प्रवाशांना ७ ते ८ तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. यात भरीसभर म्हणजे, तपासणीनंतर प्रवाशांच्या हातावर मारण्यात येणाऱ्या स्टॅम्पमुळे अनेकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत.
हातावर मारण्यात येणाºया या स्टॅम्पसाठी नेमकी कसली शाई वापरली जात आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षेची कुठलीही काळजी घेतली जात नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे. एकाच फळीवर प्रत्येक प्रवाशाला हात ठेवायला सांगून स्टॅम्प मारले जात असल्याने त्यात एखादा प्रवासी जरी कोरोनाची लागण झालेला असेल, तर त्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोकणात जाणारे मुंबईकर कोरोनाचे वाहक ठरतील की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग सध्या ग्रीन झोनमध्ये असून मुंबईकर प्रवाशांचे हे चित्र पुढेही असेच दिसत राहिले, तर राज्यात अजून एक रेड झोन तयार व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीती कोकणवासीय व्यक्त करत आहेत.

मुंबई ते देवगड प्रवासात आम्हा प्रवाशांना खारेपाटण चेकपोस्टवर थांबवले. चेकिंग सकाळी सातपासून रांगेत उभे होतो. दुपारी साडेतीनला क्रमांक आला. चेकपोस्टवर बाजूला लावलेल्या बांबूवर हात ठेवत प्रवासी पुढे सरकत होते.क्रमांक आल्यानंतर मोठ्यांना, लहानांना तपासून हातावर स्टॅम्प मारले. पाच-दहा मिनिटांनी स्टॅम्प मारलेल्या जागी जळजळ जाणवली. दुसºया दिवशी माझ्यासह अनेकांच्या हाताला इन्फेक्शन झाले होते. सध्या आम्हाला शाळेत वेगळे ठेवले आहे. - सागर राणे, प्रवासी

Web Title: CoronaVirus News : Infection caused by stamps to employees leaving Mumbai for Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.