CoronaVirus News: वस्तू, भाज्यांचा घरपोच पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 04:46 AM2020-05-01T04:46:52+5:302020-05-01T04:47:03+5:30

शेकडो सोसायट्यांमध्ये घरपोच किराणा, भाज्या आणि फळे वाजवी दरात पोहोचविण्यात येत आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्या आणि ग्राहक यांना जोडण्याचे काम करत महामंडळाने (एमसीडीसी) हा उपक्रम सुरू केला आहे.

CoronaVirus News: Items, home delivery of vegetables | CoronaVirus News: वस्तू, भाज्यांचा घरपोच पुरवठा

CoronaVirus News: वस्तू, भाज्यांचा घरपोच पुरवठा

Next

मुंबई : राज्याच्या सहकार विभागांतर्गत कार्यरत सहकार विकास महामंडळाने लॉकडाउनच्या काळात मुंबई-पुणे आणि ठाण्यात एक अभिनव उपक्रम हाती घेतला असून त्याद्वारे शेकडो सोसायट्यांमध्ये घरपोच किराणा, भाज्या आणि फळे वाजवी दरात पोहोचविण्यात येत आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्या आणि ग्राहक यांना जोडण्याचे काम करत महामंडळाने (एमसीडीसी) हा उपक्रम सुरू केला आहे.
महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांनी सांगितले की, मंडळाच्या वेबसाईटवर नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. आतापर्यंत ४,३४२ सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांनी आॅनलाइन खरेदीसाठी नोंदणी केली आहे. त्यातील १,८९९ सोसायट्यांच्या १४,६०९ सभासदांनी आॅनलाइन बुकिंगही केले. ३२५ सोसायट्यांमधील १००६९ ग्राहकांना वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. नाशिक, पुणे, अहमदनगर आदी भागातून येणाऱ्या फळभाज्यांचे घरपोच वाटप व्हावे यासाठी नियोजन केले आहे.

Web Title: CoronaVirus News: Items, home delivery of vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.