मुंबई : महापालिकेच्या केईएम रुग्णालयात २१४ ऑक्सिजन खाटा तैनात ठेवण्यात आल्या असून यातील १६ खाटा रिक्त आहेत. अतिजोखमीचे आजार असलेल्या रुग्णांना या खाटांची आवश्यकता असते. केईएम रुग्णालयात दिवसागणिक रुग्णांचा ओढा अधिक असल्याने या खाटाही भरत आहेत. यासाठी पालिकेने ११ हजार लीटर आॅक्सिजन क्षमता तैनात ठेवली आहे. त्यामुळे ‘केईएम’मध्ये कोविड रुग्णांसाठी आॅक्सिजन खाटांची पुरेशी व्यवस्था असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात तातडीने कोविड रुग्णांसाठी आरोग्य सुविधा सुरू करण्यात आली आहे.यासाठी ४८५ खाटा तैनात ठेवण्यात आले आहेत. यामध्ये कोरोनाबाधित आणि आॅक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी एपूण २१४ बेड तैनात असून यातील १९८ बेडवर सध्या रुग्णांना आॅक्सिजनची सुविधा देण्यात येत असल्याचे डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. या शिवाय ११ हजार लिटरच्या जंम्बो आॅक्सिजन टाकीची क्षमता २० टक्क्यांपेक्षा खाली येऊ दिली जात नाही. त्यामुळे केईएममध्ये आॅक्सिजन बेड, पुरवठयÞाची कोणतीही कमतरता नसल्याचे डॉ. देशमुख म्हणाले.>क्षमतेचा लवकरच विस्तार करणारकेईएमच्या दोन इमारतींमधील रुग्णांसाठी ११ हजार लिटरच्या टाकीतून आॅक्सिजन पुरवठा केला जात आहे. शिवाय नेहमी आॅपरेशन थिएटर, आयसीयूसाठी लागणारा मोठयÞा प्रमाणातील आॅक्सिजनही अतिरिक्तपणे उपलब्ध होत आहे. तसेच रुग्णालयासाठी आणखी १३ हजार लिटर क्षमतेची नवीन आॅक्सिजन टाकी बसवण्यात आली असून दोन दिवसांत कार्यान्वित होणार असल्याची माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
CoronaVirus News: केईएम रुग्णालयात २१४ ऑक्सिजन खाटा, ११ हजार लीटरची क्षमता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 1:11 AM