CoronaVirus News: नव्याने आढळणाऱ्या कोरोनाग्रस्तांची फुप्फुसे पांढरी; छातीच्या एक्स-रेमध्ये कमालीचा बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 01:43 AM2021-02-26T01:43:01+5:302021-02-26T06:50:13+5:30
छातीरोगतज्ज्ञ डॉ. राजरतन सदावर्ते यांच्या म्हणण्यानुसार, याआधीच्या काेराेना रुग्णांच्या फुप्फुसात हळूहळू बदल दिसून येत होता.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढत आहे. महत्त्वाचे म्हणजे नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या छातीच्या एक्स-रेमध्ये कमालीचा बदल झाला असून, एक्स-रे रिपोर्टमध्ये व्यक्तीच्या फुप्फुसांची अवस्था अतिशय वाईट पाहण्यास मिळत आहे. रुग्णांची फुफ्फुसे पांढरी झाली आहेत, अशा दावा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला.
छातीरोगतज्ज्ञ डॉ. राजरतन सदावर्ते यांच्या म्हणण्यानुसार, याआधीच्या काेराेना रुग्णांच्या फुप्फुसात हळूहळू बदल दिसून येत होता. मात्र, आता फुप्फुस लवकर खराब होत आहेत. ते खराब झाल्यावर रुग्ण उपचारांसाठी येत आहेत. अशा वेळी त्यांच्यावर उपचार करणे अवघड होत आहे. एक्स-रे रिपोर्टमध्ये फुप्फुसाची स्थिती खूपच वाईट आहे. रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. यातील बहुतेक वृद्ध आणि कुठला ना कुठला आजार असणारे आहेत.