CoronaVirus News: आतापर्यंत १२ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त; दिवसभरात २६ हजार ४४० रुग्णांनी केली मात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 08:19 PM2020-10-10T20:19:14+5:302020-10-10T20:21:38+5:30
सध्या राज्यात २२ लाख ६८ हजार ५७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २४ हजार ९९४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
मुंबई: राज्यात मागील काही दिवसांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे. राज्यात शनिवारी २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी झाले, तर आतापर्यंत १२ लाख ५५ हजार ७७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.७६ टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या राज्यात २ लाख २१ हजार १५६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात शनिवारी ११ हजार ४१६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ३०८ मृत्यू झाले आहेत. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने १५ लाख १७ हजार ४३४ टप्पा गाठला असून कोरोना बळींची एकूण संख्या ४० हजार ४० वर पोहोचली आहे. सध्या राज्यात २२ लाख ६८ हजार ५७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २४ हजार ९९४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
Maharashtra reports 11,416 new #COVID19 cases, 308 deaths and 26,440 discharges today. Total cases in the state rise to 15,17,434, including 40,040 deaths and 12,55,779 discharges. Active cases stand at 2,21,156: State Health Department pic.twitter.com/NaXQ4E3goe
— ANI (@ANI) October 10, 2020
राज्याचा मृत्यूदर २.६४ टक्के असून दिवसभरात नोंद झालेल्या ३०८ मृत्यूंमध्ये मुंबई ४८, ठाणे २, ठाणे मनपा ६, नवी मुंबई मनपा ६, भिवंडी निजामपूर मनपा १, मीरा भाईंदर मनपा १, वसई विरार मनपा ४, रायगड १, पनवेल मनपा ६, नाशिक ८, नाशिक मनपा ८, अहमदनगर १८, अहमदनगर मनपा ६, धुळे मनपा १, जळगाव ५, जळगाव मनपा १, पुणे २२, पुणे मनपा १६, पिंपरी चिंचवड मनपा ८, सोलापूर २२, सातारा २६, कोल्हापूर १, सांगली ७, सांगली मिरज कुपवाड मनपा ३, सिंधुदुर्ग २, रत्नागिरी ४, औरंगाबाद २, औरंगाबाद मनपा २, जालना १, लातूर २, लातूर मनपा ३, उस्मानाबाद ७, बीड ८, नांदेड मनपा २, अकोला मनपा १, अमरावती ४, अमरावती मनपा २, यवतमाळ २, वाशिम ४, नागपूर ५, नागपूर मनपा १३, वर्धा १, भंडारा ४, गोंदिया ३, चंद्रपूर ३, चंद्रपूर मनपा ४ या रुग्णांचा समावेश आहे.