Join us

CoronaVirus बापरे! कोरोनामुळे वृद्धाचा मृत्यू; मुंबईतील हॉस्पिटलने १६ लाखांचे बिल आकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 8:00 PM

प्रकरण नानावटी रुग्णालयातील आहे. सांताक्रूझच्या एका ७४ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्याला या रुग्णालयात दाखल  करण्यात आले होते. मात्र, त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला.

मुंबई : जगभरात कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मायानगरी मुंबईत तर अनेक ऑफिसेस बंद असल्याने पगार कपातीबरोबरच कर्मचारी कपातीची टांगती तलवार आहे. अशातच याच मुंबईतून धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र, त्याच्यावरील उपचाराचे बिल पाहून अनेकांचे डोळे पांढरे झाले आहेत. 

प्रकरण नानावटी रुग्णालयातील आहे. सांताक्रूझच्या एका ७४ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्याला या रुग्णालयात दाखल  करण्यात आले होते. मात्र, त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला. या वृद्धाला १४ दिवस आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. या उपचाराचे बिल तब्बल १६ लाख रुपये लावण्यात आले. हे बिल त्या वृद्धाच्या मुलाला भरावे लागले आहे. त्याने कोणताही मध्यमवर्गीय व्यक्ती एवढे बिल भरू शकेल असे वाटत नसल्याची खिन्न प्रतिक्रिया दिली आहे. 

सरकारचे नफेखोरीविरोधात आदेशकोरोना व्हायरसमुळे खासगी हॉस्पिटलकडून नफेखोरी केली जात असल्याचे आरोप गेल्या काही दिवसांपासून केले जात आहेत. यामुळे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने गेल्याच आठवड्यात कोरोना आणि अन्य आजारांवरील उपचारासाठी खासगी हॉस्पिटलना शुल्क आकारणी ठरवून दिली होती. यासाठी एक अधिसूचना जारी करण्यात आली होती. 

वृद्धाच्या मुलाने सांगितले की, आधी औषधे आणि अन्य साहित्यासाठी ८ लाख रुपये घेण्यात आले होते. तर २.८ लाख रुपये कोरोना चार्जेस म्हणून भरून घेण्यात आले होते. त्यांनी हॉस्पिटलवर मनमानी करत पैसे उकळल्याचा आरोप केला आहे. या काळात त्यांचे कुटुंबीय क्वारंटाईन करण्यात आले होते. तसेच मृतदेह पाठविण्यासाठी ८ हजार रुपये आकारल्याचा आरोप या मुलाने केला आहे. 

यावर नानावटी रुग्णालयाकडूनही खुलासा आला आहे. जुहूच्या या हॉस्पिटलचे संचालक मनप्रित सोहल यांनी जास्त बिल आकारल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे. ते म्हणाले की, रुग्णाला ३१ मार्चला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी हा रुग्ण अन्य आजारांनी पीडित होता. यामुळे त्याचे अन्य अवयव खराब झाल्यानंतर गंभीर स्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारावेळी त्यांचे निधन झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या रुग्णाची आधी हृदय शस्त्रक्रिया झाली होती. भरती केले तेव्हा श्वास घेता येत नव्हता. त्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्याना हाय-एंड कंटीन्यूअस रेनल रिप्लेसमेंट थेरेपीची गरज होती. अशा पेशंटला दिवसाला लाखावर खर्च येणे अपेक्षितच आहे.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus वाईन शॉप नाही, मालमत्ता विक्रीतून घसघशीत महसूल; पुण्यातील उद्योजकाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गिलगिट बाल्टिस्तान तत्काळ खाली करा; भारताचा पाकिस्तानला गंभीर इशारा

CoronaVirus लॉकडाऊनमध्ये भारतासारखीच सूट दिली; 'या' देशांमध्ये कोरोनाचा धोका वाढला

कुलभूषण जाधवसाठी अजित डोवालांचे मागच्या दाराने प्रयत्न; हरीष साळवेंचा गौप्यस्फोट

IFSC केंद्र नेमके आहे तरी काय? गिफ्ट सिटीचा मालक कोण? जाणून घ्या...

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबई