CoronaVirus News: महापौरांनी घेतला बोरीवली, दहिसर विभागातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 01:40 AM2020-10-04T01:40:38+5:302020-10-04T01:41:39+5:30

महापौरांनी दहिसर चेकनाका येथील कोविड जम्बो फिल्ड हॉस्पिटलला भेट देऊन तेथील आरोग्य व्यवस्था व इतर सुविधांची पाहणी केली.

CoronaVirus News: Mayor reviews Borivali, Dahisar health system | CoronaVirus News: महापौरांनी घेतला बोरीवली, दहिसर विभागातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

CoronaVirus News: महापौरांनी घेतला बोरीवली, दहिसर विभागातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

Next

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बोरीवली, दहिसर विभागातील आरोग्य व्यवस्थेचा नुकताच आढावा घेतला. बोरीवली (पूर्व) येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या नवीन इमारतीची पाहणी केली व नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी हे रुग्णालय त्वरित सुरू करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. या रुग्णालयात एकूण १५० बेड प्रस्तावित आहेत. तसेच महापौरांनी दहिसर चेकनाका येथील कोविड जम्बो फिल्ड हॉस्पिटलला भेट देऊन तेथील आरोग्य व्यवस्था व इतर सुविधांची पाहणी केली.

भगवती रुग्णालयाच्या नवीन प्रस्तावित इमारतीच्या कामकाजाची पाहणी महापौरांनी केली. सदर इमारतीचे काम संथगतीने सुरू असून या कामाला गती मिळण्यासाठी त्वरित वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्याचे आश्वासन महापौरांनी यावेळी दिले.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या आर-मध्य विभागातील कामकाजाचा आढावा घेतला, तसेच सदर मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांकडे पोहोचून त्यांची माहिती संकलित करावी. कोणी संशयित रुग्ण आढळल्यास त्यांची तपासणी करावी जेणेकरून कोरोनाच्या साथीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणे शक्य होईल, असे आवाहन महापौरांनी केले.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेकरिता शिवसेना विभाग क्र १ मध्ये विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस यांच्या आमदार निधीतून पल्स आॅक्सिमीटर, थर्मल गन, सॅनिटायझर्स, फेस शिल्ड, मास्क, पीपीई किट्स इत्यादी साहित्य देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ महापौरांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: CoronaVirus News: Mayor reviews Borivali, Dahisar health system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.