Join us

CoronaVirus News : धनंजय मुंडेंची कोरोनावर यशस्वी मात; योद्ध्यांचे हात जोडून मानले आभार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 7:08 PM

CoronaVirus News : धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर गेल्या अकरा दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते.

ठळक मुद्देरुग्णालयातून बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी हात उंचावून आणि हात जोडत डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास धनंजय मुंडेंना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी हात उंचावून आणि हात जोडत डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर गेल्या अकरा दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची दुसरी कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. परंतू, नियमानुसार पुढील 14 दिवस धनंजय मुंडे यांना होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे.

धनंजय मुंडे यांच्यासोबत कोरोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव, एक स्वीय सहाय्यक, दोन वाहन चालक, एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या सर्वांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली. त्यामुळे आता केवळ एक अंगरक्षक आणि एक कुक असे दोघेच जण  रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्याही प्रकृतीत सुधारणा होत आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे हे कोरोनाची लागण होऊन बरे झालेले तिसरे मंत्री आहेत. याआधी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती.त्यांनी या आजारावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यानंतर, आता धनंजय मुंडेंही कोरोनावर मात केली आहे.

आणखी बातम्या...

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षावाल्याचा 'देसी जुगाड', व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार जैसे थे!

ऑनलाईन द्वेष, गुंडगिरी यावर आळा घाला - रतन टाटा

"आम्ही चीनला धडा शिकवण्यासाठी अन् शहीद जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जातोय"

Google मुळे 40 वर्षांनंतर 93 वर्षीय आजी आपल्या कुटुंबीयांना भेटली!

राखी सावंतचा दावा; स्वप्नात आला सुशांत सिंग राजपूत अन् म्हणाला, 'तुझ्या पोटी घेईन पुनर्जन्म!'

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसधनंजय मुंडे