CoronaVirus News: दुसऱ्या दिवशीही मुंबईत ११००पेक्षा अधिक रुग्ण; राज्यातही चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 01:33 AM2021-02-26T01:33:40+5:302021-02-26T06:51:44+5:30

दुसऱ्या दिवशीही मुंबईत ११००पेक्षा अधिक रुग्ण; राज्यातही चिंतेत भर

CoronaVirus News: More than 1100 Corona patients in Mumbai on second day | CoronaVirus News: दुसऱ्या दिवशीही मुंबईत ११००पेक्षा अधिक रुग्ण; राज्यातही चिंतेत भर

CoronaVirus News: दुसऱ्या दिवशीही मुंबईत ११००पेक्षा अधिक रुग्ण; राज्यातही चिंतेत भर

Next

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला असून, सलग दुसऱ्या दिवशी आठ हजारांवर नव्या रुग्णांची भर पडली आहे. गुरुवारी दिवसभरात ८,७०२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ५६ मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईतही गुरुवारी  १ हजार १४५ नवे कोरोनाबाधित आढळले असून ५ जणांचा मृत्यू झाला. 

१८ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोरोनावाढीचा दर ०.२५ टक्के इतका आहे. मुंबईतील रूग्ण दुप्पटीचा कालावधी २७३ दिवस आहे. मुंबईखालोखाल नागपूर, पुणे, पिंपरी, नाशिक, अकोला आणि औरंगाबाद या शहरांत प्रादुर्भाव वाढत आहे.  अमरावतीत ९०६ रुग्ण आढळून आले असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी सहा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ४८७ झाली आहे, तर ९०६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३२,८०१ झालेली आहे. फेब्रुवारीच्या २५ दिवसांत १०,८५२ कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्याने जिल्हा हादरला आहे. 

६४,२६०रुग्ण राज्यात सध्या उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दिवसभरात ३,७४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत २०,१२,३६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४९% एवढे झाले आहे.८,७०२ नवीन काेेराेना रुग्ण गुरुवारी सापडले. ५६ मृत्यूंची नोंद झाली. 

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख २२ हजार ८४३ झाली आहे. आतापर्यंत ११ हजार ४५८ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ लाख १ हजार ५२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 सध्या मुंबईत ८ हजार ९९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्के आहे. २४ फेब्रुवारीपर्यंत मुंबईत कोरोनाच्या एकूण चाचण्या ३२ लाख ८ हजार ६८५ झाल्या आहेत.  मुंबईतील रूग्ण दुप्पटीचा कालावधी २७३ दिवस आहे.

Web Title: CoronaVirus News: More than 1100 Corona patients in Mumbai on second day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.