CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील 27 जिल्ह्यांमधील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 01:04 PM2020-06-12T13:04:27+5:302020-06-12T13:05:04+5:30

एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

CoronaVirus News: More than 50 per cent corona free patients in 27 districts of the state | CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील 27 जिल्ह्यांमधील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त 

CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील 27 जिल्ह्यांमधील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त 

Next

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यभरात गुरुवारी ३ हजार ६०७ जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९७ हजार ६४८ वर पोहचली आहे. तसेच आतापर्यत ३ हजार ५९०हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच राज्य सरकारकडूनही कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

...तर सहन करणंही कठीण होईल; चीनची भारताला पुन्हा धमकी

राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी २७ जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. ही टक्केवारी राज्य सरकारने 10 जून रोजी जारी केलेल्या आकडेवारीच्या आधारावर काढण्यात आली आहे.

५० टक्क्यांपेक्षा जास्त कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त असणारे जिल्हे पुढील प्रमाणे आहे- 

रायगड, नाशिक, अहमदनगर, नंदूरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, औरंगाबाद, नांदेड,वर्धा, चंद्रपूर ,जालना, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर.

दरम्यान, भारतातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भारतात आतापर्यत २,९७८,२८३ जणांना कोरोनाची लागण झाली असून ८,५०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या सात दिवसांत भारतात ९,५०० हून अधिक नवीन कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. एका दिवसात मृतांची संख्याही प्रथमच ३०० च्या वर गेली आहे. 

देशाभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असली तरी अजून सामुदायिक संसर्ग झाला नसल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) सांगण्यात आले आहे. देशातील लोकसंख्येनुसार एक टक्क्यांहून कमी लोकांपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने, देशात कोरोनाचा समूह संसर्ग झाला असल्याचे म्हणणे चुकीचे असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक बलराम भार्गव यांनी खुलासा आहे. 

CoronaVirus News: दिलासादायक! भारतातील कोरोनाच्या समूह संसर्गाबाबत ICMRने केला मोठा खुलासा

Web Title: CoronaVirus News: More than 50 per cent corona free patients in 27 districts of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.