Join us

CoronaVirus News in Mumbai: महापालिकेच्या १४ सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 1:10 AM

नायर रुग्णालयातील नऊ रक्षकांचा समावेश आहे. यापैकी कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका सुरक्षारक्षकाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई : महापालिकेची कार्यालये, रुग्णालयांमध्ये तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनाही कोरोनाचा संसर्ग होऊ लागला आहे. आतापर्यंत १४ सुरक्षारक्षकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये नायर रुग्णालयातील नऊ रक्षकांचा समावेश आहे. यापैकी कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका सुरक्षारक्षकाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.पहारा देत असताना या कर्मचाऱ्यांचा अनेक वेळा कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क होत असतो. यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. नायर रुग्णालयातील नऊ सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यातील एक महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाची कर्मचारी आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत. याआधीही तीन सुरक्षारक्षकांना कोरोना झाला आहे़

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस