मुंबई : मुंबईत कोरोनामुळे ३८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद मुंबई महापालिकेने रविवारच्या अहवालात केली आहे. यातील १३ मृत्यू ८ ते १५ मे दरम्यानचे आहेत.मृत रुग्णांपैकी २३ जणांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील २८ रुग्ण पुरुष व १० रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी तीन जणांचे वय ४० वर्षाखाली होते. वीस जणांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित १५ रुग्ण ४० ते ६० वर्षादरम्यान होते. रविवारी धारावीत कोरोनाची नव्याने ४४ प्रकरणे आढळली. येथील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १ हजार २४२ झाला आहे. माहीम येथे नव्याने ६ प्रकरणे आढळली. येथील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १९३ झाला आहे. दादर येथे नव्याने ५ प्रकरणे आढळली. येथील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १५९ झाला आहे.नीती आयोगाने मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १४.५ दिवसावर आला असल्याची माहिती दिली आहे. सात दिवसानंतर रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे. यामुळे अधिक खाटा उपलब्ध होण्यात हातभार लागणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान येत्या मंगळवारपासून रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांनी आपले अतिदक्षता कक्ष महानगरपालिकेस वापरण्यास मुभा दिली आहे. दुसऱ्या जिल्ह्यातील डॉक्टर मोठ्या संख्येने मुंबईत येत असून डॉक्टरांची कोणतीही कमतरता नाही.- इकबाल सिंग चहल, आयुक्त, मुंबई महापालिका
CoronaVirus News in Mumbai : मुंबईत ३८ जणांचा मृत्यू; १५७१ बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 4:51 AM