CoronaVirus News in Mumbai: मुंबईत आणखी ५ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 05:56 AM2020-05-02T05:56:31+5:302020-05-02T05:56:55+5:30

मुंबईत दिवसभरात ७५१ रुग्णांचे निदान झाले असून, एकूण रुग्णसंख्या ७ हजार ८१२ आहे.

CoronaVirus News in Mumbai: 5 more patients die in Mumbai | CoronaVirus News in Mumbai: मुंबईत आणखी ५ रुग्णांचा मृत्यू

CoronaVirus News in Mumbai: मुंबईत आणखी ५ रुग्णांचा मृत्यू

Next

मुंबई : मुंबईत शुक्रवारी कोरोनामुळे ५ रुग्णांंचा मृत्यू झाला आहे. तर एकूण मृत्यू २९५ झाले आहेत. मुंबईत दिवसभरात ७५१ रुग्णांचे निदान झाले असून, एकूण रुग्णसंख्या ७ हजार ८१२ आहे. मुंबई पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भरती झालेल्या एकूण रुग्णांचा आकडा ४८४ आहे. तर, एकूण बाधितांचा आकडा ७५१ आहे. शुक्रवारी ९५ रुग्ण बरे झाले. तर ५ जणांचा मृत्यू झाला. ५ पैकी ३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. ५ पैकी ३ रुग्ण पुरुष आणि २ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी एकाचे वय ४० पेक्षा कमी होते. दुसऱ्याचे वय ६० वर होते. उर्वरित २ रुग्ण ४० ते ६० दरम्यानचे होते. एकूण डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांपैकी १०८ रुग्ण हे मुंबई बाहेरील निवासी असून उपचारासाठी मुंबईत आले आहेत.
>दोन लाख तपासण्या
मुंबईत पालिकेने घरोघरी जाऊन २ लाखांहून अधिक तपासण्या केल्या. यात २७२ लोकांमध्ये आॅक्सिजनची कमी व इतर विकार आढळले. ७५ ते ८०% रुग्णांत कोरानाची सौम्य, अतिसौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नव्हती. तरीही त्यांना विलगीकरण कक्षात त्यांना दाखल केले जात आहे.

Web Title: CoronaVirus News in Mumbai: 5 more patients die in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.