Join us

CoronaVirus News in Mumbai: मुंबईत आणखी ५ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 5:56 AM

मुंबईत दिवसभरात ७५१ रुग्णांचे निदान झाले असून, एकूण रुग्णसंख्या ७ हजार ८१२ आहे.

मुंबई : मुंबईत शुक्रवारी कोरोनामुळे ५ रुग्णांंचा मृत्यू झाला आहे. तर एकूण मृत्यू २९५ झाले आहेत. मुंबईत दिवसभरात ७५१ रुग्णांचे निदान झाले असून, एकूण रुग्णसंख्या ७ हजार ८१२ आहे. मुंबई पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भरती झालेल्या एकूण रुग्णांचा आकडा ४८४ आहे. तर, एकूण बाधितांचा आकडा ७५१ आहे. शुक्रवारी ९५ रुग्ण बरे झाले. तर ५ जणांचा मृत्यू झाला. ५ पैकी ३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. ५ पैकी ३ रुग्ण पुरुष आणि २ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी एकाचे वय ४० पेक्षा कमी होते. दुसऱ्याचे वय ६० वर होते. उर्वरित २ रुग्ण ४० ते ६० दरम्यानचे होते. एकूण डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांपैकी १०८ रुग्ण हे मुंबई बाहेरील निवासी असून उपचारासाठी मुंबईत आले आहेत.>दोन लाख तपासण्यामुंबईत पालिकेने घरोघरी जाऊन २ लाखांहून अधिक तपासण्या केल्या. यात २७२ लोकांमध्ये आॅक्सिजनची कमी व इतर विकार आढळले. ७५ ते ८०% रुग्णांत कोरानाची सौम्य, अतिसौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नव्हती. तरीही त्यांना विलगीकरण कक्षात त्यांना दाखल केले जात आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या