CoronaVirus News in Mumbai : मुंबईतील खाजगी रुग्णालयांतील८० टक्के बेड सर्व रुग्णांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 03:22 AM2020-05-21T03:22:50+5:302020-05-21T03:23:17+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढलेच तर तो आकडा ४० हजारावर जाईल. त्यासाठी बीकेसी येथे १ हजार बेडचे हॉस्पीटल तयार केले आहे.

CoronaVirus News in Mumbai: 80% beds in private hospitals in Mumbai for all patients | CoronaVirus News in Mumbai : मुंबईतील खाजगी रुग्णालयांतील८० टक्के बेड सर्व रुग्णांसाठी

CoronaVirus News in Mumbai : मुंबईतील खाजगी रुग्णालयांतील८० टक्के बेड सर्व रुग्णांसाठी

Next

मुंबई : मुंबईत खाजगी रुग्णालयांत ८० टक्के बेड कोवीड आणि नॉन कोवीड अशा दोन्ही रुग्णांसाठी वापरले जाणार आहेत. त्यावर पुढील नव्वद दिवस मुंबई महापालिकेचे नियंत्रण असेल. तेथे आकारली जाणारे दर सरकारी हॉस्पिटल सारखे असतील, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढलेच तर तो आकडा ४० हजारावर जाईल. त्यासाठी बीकेसी येथे १ हजार बेडचे हॉस्पीटल तयार केले आहे. त्यातील गंभीर रुग्णांसाठी जवळच्याच एशियन हार्ट हॉस्पीटलचे आयसीयू वापरले जाणार आहे. डॉ. रमाकांत पांडा यांच्याशी तसे बोलणे झाले आहे. शिवाय तेथेच आणखी एक हजार बेडचे नवे हॉस्पीटल उभे करणे सुरु झाले आहे. गोरेगाव येथे १ हजार बेडचे, रेसकोर्सच्या पार्र्कींग जागेत ८०० बेडचे, मुलूंड नाक्यावर सिडकोच्या वतीने १ हजार बेडचे, दहिसरला देखील तेवढ्याच क्षमतेचे अशी अनेक हॉस्पीटल्स जूनच्या मध्यापर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यरत होतील.
काही लोक मुद्दाम खोटी माहीती देत आहेत. खाजगी हॉस्पीटलमधून भरमसाठ पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत होत्या. शिवाय मुंबईत कोरोना रुग्णांच्या तपासणीत, उपचारात सुसुत्रता असणे आवश्यक होते, असे पाटील यांनी सांगितले.

Web Title: CoronaVirus News in Mumbai: 80% beds in private hospitals in Mumbai for all patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.