Join us

CoronaVirus News in Mumbai : ‘एन-९५ मास्कच्या किमतीबाबत उत्तर द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 2:28 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी एन-९५ मास्कची कमतरता आहे. मात्र, या मास्कचा काळा बाजार सुरू आहे. हा काळा बाजार थांबविणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्त्यांचे वकील मिहीर देसाई यांनी सांगितले.

मुंबई : एन - ९५ मास्कची किमान किंमत निश्चित करावी, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मंगळवारी दिले.आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी एन-९५ मास्कची कमतरता आहे. मात्र, या मास्कचा काळा बाजार सुरू आहे. हा काळा बाजार थांबविणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्त्यांचे वकील मिहीर देसाई यांनी सांगितले. केंद्राला एन-९५ मास्कची किमान किंमत ठरविण्यासंदर्भात पत्र लिहिल्याची माहिती राज्य सरकारने दिली. त्यामुळे मुख्य न्या.दीपांकर दत्ता व न्या. एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांना याबाबत केंद्राकडून सूचना घेण्याचे निर्देश दिले. एन-९५ मास्कचा काळा बाजार थांबविण्यासाठी सरकारने केंद्राच्या आदेशानुसार या वस्तूंचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश करावा व केंद्राला वस्तूंचे दर नियंत्रणांमध्ये ठेवण्याचे निर्देश द्यावेत, असे याचिकेत नमूद आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या