CoronaVirus News in Mumbai :बेस्टचे कर्मचारी आजपासून संपावर; सुरक्षेच्या मुद्द्यावर कामगार कृती समितीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:08 AM2020-05-18T05:08:55+5:302020-05-18T06:43:00+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : लॉकडाउनच्या काळातही अत्यावश्यक सेवा सुरू राहावी, यासाठी मुंबईची बेस्ट सेवा सुरू आहे. मात्र यामुळे बेस्ट कर्मचाºयांमध्ये संसर्गाचा धोका वाढला आहे.

CoronaVirus News in Mumbai : BEST employees on strike from today; Warning of Labor Action Committee on safety issue | CoronaVirus News in Mumbai :बेस्टचे कर्मचारी आजपासून संपावर; सुरक्षेच्या मुद्द्यावर कामगार कृती समितीचा इशारा

CoronaVirus News in Mumbai :बेस्टचे कर्मचारी आजपासून संपावर; सुरक्षेच्या मुद्द्यावर कामगार कृती समितीचा इशारा

googlenewsNext

मुंबई : बेस्टचे कामगार सोमवारपासून घरीच राहणार असल्याचा इशारा कामगार कृती समितीने दिला आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना विमा आणि वैद्यकीय सुरक्षा द्या, असे म्हणत समिती आपल्या भूमिकेवर ठाम आहे. तर दुसरीकडे डॉक्टर्स, नर्स, पोलीस आदी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता व इतर बससेवा नियमित कार्यरत ठेवण्यात येणार असल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी सांगितले.
लॉकडाउनच्या काळातही अत्यावश्यक सेवा सुरू राहावी, यासाठी मुंबईची बेस्ट सेवा सुरू आहे. मात्र यामुळे बेस्ट कर्मचाºयांमध्ये संसर्गाचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी आवश्यक मागण्या मान्य करण्यात याव्यात, असे बेस्ट संयुक्त कृती समितीने
म्हटले आहे. तसे झाले नाही तर सोमवारपासून बेस्ट कर्मचारी घरी राहतील, असे समितीने सांगितले आहे. यावर आता बेस्ट उपक्रमानेदेखील आपली भूमिका स्पष्ट केली असून, सोमवारी बेस्ट सेवा सुरू राहणार असल्याचे उपक्रमाने म्हटले आहे. बेस्ट उपक्रमातील ६० टक्के कामगार, कर्मचारी मुंबई हद्दीच्या बाहेर राहतात. त्यांना कामावर पोहोचण्यासाठी गाड्या उपलब्ध नाहीत. काही कर्मचाºयांच्या इमारती, वस्ती सील झाल्याने ते अडकून पडले आहेत. मात्र त्यांची गैरसोय समजून घेतली जात नाही, अशा अनेक तक्रारी वाढू लागल्या आहेत.

राज्य परिवहनच्या १२०० गाड्या तयार
मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांची ने-आण करण्याकरिता अतिरिक्त १ हजार २०० बसची मागणी बेस्टकडून राज्य परिवहन महामंडळाकडे करण्यात आली होती. त्यानुसार महामंडळाने मुंबईतील वाहतुकीकरिता १ हजार २०० बसचे नियोजन केले आहे.

१२० पेक्षा जास्त कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. आज पुन्हा एकाचा मृत्यू झाला आहे. याकडे लक्ष देणार आहेत की नाही, याचे उत्तर मिळतच नाही. आमच्या मागण्या काय आहेत? विमा सुरक्षा हवी, वैद्यकीय सुविधा द्या; पण यावर प्रशासन काहीच बोलत नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. - शशांक राव, कामगार नेते

Web Title: CoronaVirus News in Mumbai : BEST employees on strike from today; Warning of Labor Action Committee on safety issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.