मुंबई : मुंबईतील सर्वात मोठे प्रदर्शन केंद्र असणाऱ्या गोरेगाव (पूर्व) पश्चिम द्रुतगती महामार्गावरील येथील नेस्को मैदानावर उभ्या राहत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या २६०० खाटांच्या कोरोना काळजी केंद्र २ची मुंबई उपनगरचे पालकमंत्री व राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदर खात्याचे मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज दुपारी पाहणी केली.पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले, नेस्को प्रदर्शन केंद्रामध्ये ५ मोठी प्रदर्शन सभागृहे आहेत. त्यांचे रूपांतर आता विलगीकरण कक्षात करण्यात येत आहे. संपूर्ण केंद्र एकूण २६०० खाटांच्या क्षमतेचे असेल. येथे प्राणवायूची सुविधा असणाºया सुमारे २००० खाटा असतील.महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे, स्नानगृहे यासह प्रत्येक बेडला स्वतंत्र पंखा दिला जाईल. येथे ठेवण्यात येणाºया व्यक्ती आणि त्यांच्या नातलगांना त्रास होऊ नये म्हणून येथे विविध मदत कक्षही असतील. यामध्ये चौकशी कक्ष, निर्जंतुकीकरण कक्ष, वैद्यकीय तपासणी असे विविध कक्ष असतील. येथे पुरेसे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका नेमण्यात येतील. ३०० खाटा डायलेसिस व अतिदक्षता विभागासाठी राखीव ठेवण्यात येतील. संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर या तयारीबाबत अस्लम शेख व आदित्य ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले.
CoronaVirus News in Mumbai :गोरेगावच्या नेस्को केंद्रात २६०० खाटांची क्षमता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 5:07 AM