CoronaVirus News in Mumbai : दिलासादायक! रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण सात दिवसांवरून १३ दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 05:35 AM2020-05-17T05:35:05+5:302020-05-17T05:35:42+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्याच्या दुसºया आठवड्यात रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण सात दिवसांवरून १३ दिवसांवर आल्याचे दिसून येत आहे.

 CoronaVirus News in Mumbai: Comfortable! Patient doubling rate from seven days to 13 days | CoronaVirus News in Mumbai : दिलासादायक! रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण सात दिवसांवरून १३ दिवसांवर

CoronaVirus News in Mumbai : दिलासादायक! रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण सात दिवसांवरून १३ दिवसांवर

Next

मुंबई : कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असला तरी रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण २० दिवसांवर नेण्याचे लक्ष्य महापालिका प्रशासनाने ठेवले आहे. यासाठी आठ सनदी अधिकाऱ्यांची फौज गेल्या आठवड्यापासून कार्यरत आहे. याचे काही चांगले परिणाम आता दिसून येत आहेत. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्याच्या दुसºया आठवड्यात रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण सात दिवसांवरून १३ दिवसांवर आल्याचे दिसून येत आहे.
मुंबईत आतापर्यंत १७,५१२ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर ६५५ लोकांचा मृत्यू झाला आहे. मे महिन्याच्या अखेरीपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४० हजारांहून अधिक असण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबईतील खाटांची क्षमता आणि क्वारंटाइन कक्ष वाढविण्यात येत आहेत. तसेच सध्या दहा दिवसांवर असलेले रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण २० दिवसांवर आणण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने आहे.
लॉकडाउन कालावधी सर्वांत महत्त्वाचा ठरला आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधणे, जास्तीतजास्त चाचणी, फिव्हर क्लिनिक, प्रभावी क्वारंटाइन अशी काही पावले उचलण्यात आली. त्यामुळे १ मे रोजी मुंबईत ७,६२५ रुग्ण होते, तर १३ मे रोजी रुग्णसंख्या १५,५८१ इतकी झाली. या आकडेवारीवरून रुग्ण दुप्पट होण्याचा वेग सात दिवसांवरून तेरा दिवस झाल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.

खाटांची क्षमता वाढवली
१५ एप्रिलपर्यंत शासकीय रुग्णालयांमध्ये १६०० खाटा उपलब्ध होत्या. १ मेपर्यंत खाटांची संख्या २९०० पर्यंत वाढविली असून, १५ मेपर्यंत ही संख्या ३,५४० वर पोहोचली आहे. तर शासकीय रुग्णालयात पाच हजार खाटा आणि खासगी रुग्णालयांसह मोठ्या मैदानांमध्ये १० हजार खाटा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

असे सुरू आहेत प्रयत्न
कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण दहा दिवसांवरून २० दिवसांवर आणण्यासाठी पालिका प्रशासनाने आठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ८ मेपासून या अधिकाºयांनी सात परिमंडळांत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामध्ये आपल्या परिमंडळात येणाºया विभागांमध्ये एकूण बाधित रुग्णांच्या मॅपिंग, बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधणे, बाधित क्षेत्रात नियमांचे कठोर पालन, वैद्यकीय कर्मचाºयांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण आदींचा समावेश आहे.

- आतापर्यंत पालिकेने एकूण एक लाख २७ हजार लोकांच्या चाचण्या केल्या आहेत. यापैकी ११.६० टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबईतील ३२१ फिव्हर क्लिनिकमध्ये १५ हजार लोकांची तपासणी करण्यात आली. ४,५८४ लोकांची चाचणी करण्यात आली. यापैकी ३९२ बाधित असल्याचे आढळून आले.

Web Title:  CoronaVirus News in Mumbai: Comfortable! Patient doubling rate from seven days to 13 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.