मुंबई : दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस हवालदाराचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे गुरूवारी उघडकीस आले. दरम्यान विलेपार्ले पोलीस ठाण्यातील ५५ वर्षीय पोलीस हवालदाराचाही गुरुवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. ९ मे पासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.एटीएसच्या नागपाडा युनिटमध्ये कार्यरत पोलीस हवालदार ११ मेपासून टायफाइडवर उपचार घेत होते. त्यांना मधुमेहाचाही त्रास होता. १७ मे रोजी पहाटे ३ वाजता त्यांना श्वास घेण्यास त्रास होवू लागला. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यांची कोरोना चाचणी केली होती. गुरूवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दोन दिवसांत ५ पोलिसांचा मृत्यूदोन दिवसांत ५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे मुंबईत कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १० वर गेला. तर राज्यभरात १८ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
कोरोनामुळे मरण पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना मिळणार ६५ लाखमुंबई पोलीस दलात कोरोनामुळे जीव गमवावा लागणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांना ६५ लाखांची भरपाई मिळणार आहे. राज्य सरकार मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये भरपाई आणि घरातील एकाला नोकरी देईल. तर, मुंबई पोलीस फाऊंडेशनकडून १० लाख आणि खासगी बँकेकडून विमा संरक्षण म्हणून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाºया या भरपाईचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी घेतला.