CoronaVirus News in Mumbai : कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूनंतरही होतात हाल; अंत्यविधीसाठी लागते ७ ते ८ तासांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 06:38 AM2020-05-20T06:38:40+5:302020-05-20T06:38:47+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : मुंबईत रोज कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारी परवानगी आणि वेळ यामध्ये कुटुंबाची मोठी परवड होत आहे.

CoronaVirus News in Mumbai: Corona-infected patients die; Waiting for the funeral takes 7 to 8 hours | CoronaVirus News in Mumbai : कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूनंतरही होतात हाल; अंत्यविधीसाठी लागते ७ ते ८ तासांची प्रतीक्षा

CoronaVirus News in Mumbai : कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूनंतरही होतात हाल; अंत्यविधीसाठी लागते ७ ते ८ तासांची प्रतीक्षा

Next

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : मालाड (पूर्व) येथील एका खासगी इस्पितळात मंगळवारी सकाळी ११.३० वाजता येथील एका ज्येष्ठ नागरिकाचे(७९) निधन झाले. गेल्या आठवड्यात ते कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले होते़ त्यांचा मृतदेह दुपारी ३.१५ वा. ओशिवरा येथील स्मशानभूमीत आणण्यात आला. परंतु तिथे आधीच अंत्यसंस्काराला रांगा असल्याने त्यांचा नंबर लागेपर्यंत रात्रीचे आठ ते साडेआठ वाजतील असे सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाइकांनी बोरीवली येथे चौकशी केली असता तिथे कमी वेळ प्रतीक्षा करावी लागेल असे कळल्याने हा मृतदेह बोरीवलीच्या स्मशानभूमीत नेण्यात आला. तिथेसुद्धा अजून दोन ते अडीच तास थांबावे लागेल असे सांगण्यात आले. थोडक्यात कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूनंतरही हाल चालू असल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या मानसिक क्लेशात आणखी भर पडली आहे, अशी निराशाजनक प्रतिक्रिया त्यांच्या नातेवाइकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
मुंबईत रोज कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारी परवानगी आणि वेळ यामध्ये कुटुंबाची मोठी परवड होत आहे. कोरोना रुग्णाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे हासुद्धा आपत्ती व्यवस्थापनाचा एक अविभाज्य भाग असून त्यात सुसूत्रता असणे आवश्यक आहे. मुंबईत जर दररोज कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत असेल तर मुंबईतील विविध स्मशानभूमीत कोणत्याही क्षणी किती मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी आले आहेत आणि अंत्यसंस्काराला किती वेळ लागेल याची एकत्रित माहिती सॉफ्टवेअरद्वारे इस्पितळांना आणि रुग्णांच्या कुटुंबीयांना मिळण्याची सुविधा पालिका प्रशासनाने केली पाहिजे. अंत्यसंस्काराला किती वेळ लागेल याची माहिती मृतांच्या कुटुंबीयांना देण्यासाठी पालिकेने यासाठी एक टोल नंबर कार्यान्वित करणे गरजेचे आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही या स्मशानभूमीतून त्या स्मशानभूमीत मृतदेह नेण्यासाठी होणारी अशी परवड थांबेल, असे मत त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले.

मुंबईत रोज कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारी परवानगी आणि वेळ यामध्ये कुटुंबाची मोठी परवड होत आहे.कोरोना रुग्णाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे हासुद्धा आपत्ती व्यवस्थापनाचा एक अविभाज्य भाग असून त्यात सुसूत्रता असणे आवश्यक आहे.

Web Title: CoronaVirus News in Mumbai: Corona-infected patients die; Waiting for the funeral takes 7 to 8 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.