मुंबई : काही दिवसांपूर्वीच सायन रुग्णालयात कोरोना रुग्णांशेजारीच कोरोना मृतदेह प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या विषयावर प्रसिद्धिमाध्यमांत आणि विरोधकांकडून प्रचंड चर्चा झाली. मात्र तेथील निवासी डॉक्टरांनी आता यूट्युबच्या एका व्हिडीओद्वारे सायन रुग्णालयातील परिस्थिती समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अपुरी संरक्षण साधने आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कसा भार पडतो आहे आणि तरीदेखील ते आपला जीव धोक्यात घालून सायन रुग्णालयातील वाढता भार हाताळण्याचा प्रयत्न करत असल्याचे निवासी डॉक्टरांनी या व्हिडीओतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.शीव रुग्णालय हे मध्यवर्ती असल्याने मुंबईतील बºयाच ठिकाणांहून रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. कोरोना रुग्णांचा ओघही येथे मोठा आहे. रुग्णालयाच्या क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांचा भार वाढू लागला आहे. केईएम, नायर, राजेवाडी रुग्णालयांत कोरोनाबाधितांसाठी कोविड सेंटर्स असूनही अधिकाधिक रुग्ण उपचारासाठी येथे असतात. त्यामुळे डॉक्टरांवरील रुग्णभार नेहमीपेक्षा साहजिकच खूप जास्त झाला आहे. आमच्या सहकाºयांनाही या काळात कोरोनाबाधा झाली; मात्र डॉक्टरांनी दिवसांतील २० तासांहून अधिक वेळ काम करून रुग्णसेवा चालू ठेवली आहे. इतकेच काय तर तरुण इंटर्नसही केवळ सहा हजार रुपयांच्या स्टायपेंडवर आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. आरोग्य कर्मचाºयांची रिक्त पदे यासारखा गंभीर प्रश्न वर्षानुवर्षे सोडविला जात नाही; मात्र एक व्हिडीओ देशाच्या कानाकोपºयात पोहोचतो आणि आम्ही देत असलेल्या रुग्णसेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. असे का, असा सवाल निवासी डॉक्टरांनी या व्हिडीओमधून लोकांना केला आहे.कोविड -१९ च्या सेंटर्सवर आणि कोविड ट्रेसिंग, आयसीयू साºयाच ठिकाणी आम्ही निवासी डॉक्टर आमची सेवा देत आहोत. आम्ही या क्षेत्रात उतरण्यापूर्वी अत्यावश्यक सेवा म्हणून तुमचे संरक्षक कवच बनण्याची शपथ घेतली होती; मात्र त्याचवेळी तुम्ही आमच्या पाठीशी असण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे घरात राहा, सुरक्षित राहा मात्र या महामारीचे राजकारण करू नका, असे आवाहन या निवासी डॉक्टरांनी केले आहे.भार नेहमीपेक्षा खूपच जास्तकेईएम, नायर, राजावाडी रुग्णालयांत कोरोनाबाधितांसाठी कोविड सेंटर्स असूनही अधिकाधिक रुग्ण उपचारासाठी येथे असतात. त्यामुळे डॉक्टरांवरील रुग्णभार नेहमीपेक्षा साहजिकच खूप जास्त झाला आहे. याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
CoronaVirus News in Mumbai : कोरोना महामारीचे राजकारण करू नका, सायनमधील निवासी डॉक्टरांचे व्हिडीओद्वारे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 6:17 AM