CoronaVirus News in Mumbai :कर्मचारी पाच दिवस करणार काम, म्युनिसिपल मजदूर युनियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 04:49 AM2020-05-22T04:49:05+5:302020-05-22T04:51:15+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : महापालिकेच्या विविध रुग्णालयात काम करत असलेल्या कर्मचा-यांना कोरोना महामारीच्या काळात योग्य सोयीसुविधा, संरक्षण देत नसल्याने अनेक कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली.
मुंबई : लॉकडाउन दरम्यान उपनगरातून कर्तव्य बजावण्यासाठी येणाऱ्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था परिसरातील हॉटेल्स व्यतिरिक्त, लॉज, हॉस्टेल्स, खाली असलेल्या वॉर्डमध्ये सोय करण्याच्या मागणीला मान्यता देण्यात आली असून कोविड-१९मध्ये काम करणाºया सर्व संवर्गातील कर्मचाºयांना यापुढे ५ दिवस काम आणि २ दिवस सुट्टी देण्यात येणार असल्याचे मान्य करण्यात आल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर यूनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी दिली. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ३ मार्च,२०२० पासून काम करणाºया सर्व संवर्गातील कर्मचाºयांना (रोजंदारी, बहुउद्देशीय कामगारांसहित) दैनंदिन रु. ३००/- तसेच कायम कर्मचाºयांना १ एप्रिल, २०२० पासूनचा भत्ता बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या विविध रुग्णालयात काम करत असलेल्या कर्मचाºयांना कोरोना महामारीच्या काळात योग्य सोयीसुविधा, संरक्षण देत नसल्याने अनेक कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर पालिका आरोग्य विभाग कर्मचाºयांच्या संरक्षणासाठी काहीही करत नसल्याने कर्मचाºयांमधून नाराजीचा सूर उमटत होता.
यामुळे कर्मचाºयांनी म्युनिसिपल मजदूर यूनियनच्या नेतृत्वाखाली सोमवारी निषेध व्यक्त केला व आपल्या समस्यांबाबत संबंधित अधिष्ठात्यांकडे लेखी पत्रव्यवहार केला. ज्याची दखल घेत नुकत्याच झालेल्या वरिष्ठ आरोग्य अधिकाºयांच्या एका बैठकीत कर्मचाºयांच्या मागण्या मान्य करण्याबाबत प्रशासनाने लेखी आश्वासन दिले असल्याची माहिती नारकर यांनी दिली.
याशिवाय सर्व संवर्गातील कर्मचाºयांचा रुपये ५० लाखांचा विमा उतरविण्यात यावा तसेच कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊन निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना रुपये ५० लाखांचे विशेष अनुदान आणि शैक्षणिक अर्हतेनुसार कायस्वरूपी नोकरी देण्यात यावी, असा प्रस्ताव आणि अशी शिफारस महापालिका आयुक्त यांना करण्याचे मान्य करण्यात आलेले आहे.
- ५५ वर्षे वरील सर्व संवर्गातील कर्मचाºयांना आणि गरोदर महिलांना कोविड-१९मध्ये काम देण्यात येणार नाही. याशिवाय अन्य काही मागण्यांनाही मान्यता दिल्याची माहिती नारकर यांनी दिली.