CoronaVirus News in Mumbai: कोविडविरोधात लढा तीव्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 01:41 AM2020-05-01T01:41:14+5:302020-05-01T01:41:26+5:30

मुंबईतील निर्देशित कोविड रुग्णालयांमध्ये एकूण २ हजार ६०२ खाटांची क्षमता असून, ज्या कोरोना रुग्णांना अतिदक्षता उपचार आवश्यक आहेत त्यांना तेथे दाखल करण्यात येते.

CoronaVirus News in Mumbai: fight against Kovid intensifies | CoronaVirus News in Mumbai: कोविडविरोधात लढा तीव्र

CoronaVirus News in Mumbai: कोविडविरोधात लढा तीव्र

Next

मुंबई : मुंबईत सध्या २९ निर्देशित कोविड रुग्णालय म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. यात खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. तर शहर, उपनगरात ९ निर्देशित कोविड आरोग्य केंदे्र आहेत. त्यामुळे मुंबईत आता कोरोना (कोविड-१९) विरोधातला लढा तीव्र होत असून, मुंबई महानगरपालिका विशेष सोयीसुविधा उपलब्ध करण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. मुंबईतील निर्देशित कोविड रुग्णालयांमध्ये एकूण २ हजार ६०२ खाटांची क्षमता असून, ज्या कोरोना रुग्णांना अतिदक्षता उपचार आवश्यक आहेत त्यांना तेथे दाखल करण्यात येते.
शहरातील निर्देशित कोविड आरोग्य केंद्रात एकूण ६२७ खाटांची क्षमता असून या ठिकाणी साठ वर्षांवरील, तसेच ज्यांना अन्य आजार व तीव्र स्वरूपाची बाधा आहे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, कोविड हेल्थ सेंटरमध्ये कोरोना विषाणूबाधित रुग्णांच्या अत्यंत निकट संपर्कात ज्या व्यक्ती येतात आणि ज्या मुख्यत्वे अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी, झोपडपट्टी विभागात राहतात, ज्यांना घरगुती अलगीकरण शक्य नसते. त्यांच्यासाठी केलेली स्थानिक क्वारंटाइन केंद्रही आहेत. सद्यस्थितीत २४२ ठिकाणी अशी सुविधा असून त्यात १७ हजारांपेक्षा अधिक नागरिक राहू शकतात इतकी त्यांची क्षमता आहे. याखेरीज, कोविड केअर सेंटर या वर्गीकरणात कोरोनाची लक्षणे दिसत नसली तरी कोरोनाबाधित असलेल्या अथवा सौम्य स्वरूपात बाधा असलेल्या, तसेच ६०पेक्षा कमी वय असलेल्या, सोबत अन्य आजार नसलेल्या व्यक्तींसाठी ही व्यवस्था आहे. सध्या या स्वरूपाची ८४ केंद्रे असून त्यात १४ हजारांपेक्षा अधिक रुग्ण सामावून घेण्याची क्षमता आहे.
>एका फोनवर समजणार खाटांची उपलब्धता
ज्या रुग्णांना रुग्णवाहिका, रुग्णालयात खाटांची उपलब्धता यादी आदी स्वरूपाची माहिती जाणून घेण्याची आवश्यकता आहे, त्यांनी १९१६ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Web Title: CoronaVirus News in Mumbai: fight against Kovid intensifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.