Join us

CoronaVirus News in Mumbai : बैठकीतील निर्णय ८० टक्के खाटा राखीव ठेवणे बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 1:46 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : पालिका प्रशासन आणि खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींची यासंदर्भात सोमवारी विशेष बैठक पार पडली. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २१ हजारांवर पोहचला आहे.

मुंबई : मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारी रुग्णालयांवरील ताण वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित तसेच अन्य आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये ८० टक्के खाटा राखीव ठेवणे व राज्य सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार रूग्णांवर उपचार करणे बंधनकारक करण्यात आले आहे.पालिका प्रशासन आणि खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींची यासंदर्भात सोमवारी विशेष बैठक पार पडली. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २१ हजारांवर पोहचला आहे. अनेक जण खासगी रुग्णालयातही उपचार घेत आहेत. मात्र, काही खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णांकडून दुप्पट रक्कम उकळली जात आहे. ही लूट थांबवून मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सोमवारी खासगी रूग्णालयाच्या संचालकांची बैठक पालिका मुख्यालयात बोलावली होती. यावेळी खासगी रुग्णालयांनी आपल्या अडचणीही मांडल्या. मात्र कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती ही अपवादात्मक असल्याने कोरोनाची बाधा असलेल्या व नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांना योग्य पद्धतीने उपचार मिळणे गरजेचे आहे, असे मत आयुक्तांनी व्यक्त केले. तसेच सर्वांना समान पद्धतीने खाटा वाटप होण्यासाठी खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा सरकारी दर, अटी व शर्तीनुसार निश्चित करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.या बैठकीला पालिका आयुक्तांबरोबर अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, सुरेश काकाणी, सहआयुक्त रमेश पवार, उपायुक्त चंद्रशेखर चोरे, खासगी रूग्णालयांचे समन्वयक बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ.गौतम भन्साली यांच्यासह मुंबईतील विविध खासगी रुग्णालयांचेज्येष्ठ अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.अडचणी सोडविण्याचे पालिकाा आयुक्तांचे आश्वासनलॉकडाउनमुळे खासगी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रुग्णालयात पोहोचण्यास अडचणी येत असल्याची माहिती खासगी रूग्णालयाच्या प्रतिनिधींनी पालिका आयुक्तांना दिली. याची दखल घेत ही अडचण सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.इतर आजारांनी त्रस्त रुग्णांना दिलासाकोरोनाबाधित व इतर रुग्णांसाठी खासगी रुग्णालयातील खाटांचे केंद्रीय पद्धतीने वाटप करण्यात येईल. यामुळे हृदयविकार तसेच इतर आजार असणाºयांनाही खाटा उपलब्ध होतील. या उपचार खर्चाचे दरपत्रक आणि संबंधित अटी व शर्ती सरकारकडून निर्धारित करण्यात येतील, अशी माहिती आयुक्तांनी दिली. यामुळे इतर आजारांनी त्रस्त रुग्णांना दिलासा मिळेल.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई