CoronaVirus News in Mumbai : कोरोनामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना बेस्टमध्ये नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 01:02 AM2020-05-17T01:02:33+5:302020-05-17T01:03:39+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : आतापर्यंत सहा कर्मचाºयांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कर्मचाºयांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला बेस्टमध्ये नोकरी देण्यात येणार आहे.
मुंबई : लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्ट उपक्रमाच्या बस सेवेमुळे दिलासा मिळाला आहे. मात्र यामुळे बस कर्मचाºयांना कोरोना होण्याचा धोका वाढला आहे. आतापर्यंत सहा कर्मचाºयांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कर्मचाºयांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला बेस्टमध्ये नोकरी देण्यात येणार आहे. यापैकी चार कर्मचाºयांच्या वारसांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.
लोकांच्या संपर्कात आल्याने बेस्ट बस चालक, वाहक तसेच कर्मचाºयांमध्ये संसर्गाचा धोका वाढला आहे. आतापर्यंत ९५ कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी सहा कर्मचाºयांचा मृत्यू झाला आहे. कर्तव्यावर असताना कर्मचाºयाचे कोरोनामुळे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला. याच धर्तीवर बेस्टनेही आता असा निर्णय घेतला. कोरोनामुळे मरण पावलेल्या कर्मचाºयांच्या कुटुंबातील एकाला बेस्ट उपक्रमात कायमस्वरूपी नोकरीचे नियुक्तीपत्र महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिले आहे.