CoronaVirus News in Mumbai : मुंबईत नव्या मार्गावर यंदा मेट्रो धावणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 04:33 AM2020-05-18T04:33:03+5:302020-05-18T06:45:56+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : मेट्रो २ अ आणि ७ या मार्गिकांचे काम प्रगतीपथावर असले तरी डिसेंबर, २०२० या निर्धारित वेळेत ते पूर्ण होणे अशक्य आहे. त्यासाठी एप्रिल, २०२१ पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

CoronaVirus News in Mumbai: Metro will not run on the new route in Mumbai this year | CoronaVirus News in Mumbai : मुंबईत नव्या मार्गावर यंदा मेट्रो धावणार नाही

CoronaVirus News in Mumbai : मुंबईत नव्या मार्गावर यंदा मेट्रो धावणार नाही

Next

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू झालेल्या लॉकडाउनमुळे एमएमआरडीएच्या सर्व प्रकल्पांची डेडलाइन किमान तीन महिन्यांनी लांबणीवर पडणार आहे. मेट्रो २ अ आणि ७ या मार्गिकांचे काम प्रगतीपथावर असले तरी डिसेंबर, २०२० या निर्धारित वेळेत ते पूर्ण होणे अशक्य आहे. त्यासाठी एप्रिल, २०२१ पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळे या वर्षी मुंबईतल्या नवीन मार्गिकांवर मेट्रो धावणार नसल्याचे एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ट्रान्स हार्बर लिंकसह प्रस्तावित १६ मेट्रो मार्गिकांपैकी १२ मार्गिकांच्या प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली आहे. त्यापैकी दहिसर डीएन (२ अ) आणि
दहिसर अंधेरी (७) या मार्गिकांचे सर्वप्रथम म्हणजे डिसेंबर, २०२० मध्ये लोकार्पण अपेक्षित होते. हे काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल, असा दावा गेल्या आठवड्यापर्यंत केला जात होता. मात्र, एमएमआरडीएच्या ताफ्यात ११ हजार मजुरांची फौज सक्रीय असली तरी या कामांमध्ये व्यत्यय निर्माण होत आहे. देशातून मागवली जाणारी आणि परदेशातून आयात होणारी साधन- सामग्री मिळेनाशी झाली आहे. रोलिंग स्टॉकचे कामही मंदावले आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत काम पूर्ण होणे अवघड आहे.
मुंबईतील कोरोनाचा प्रकोप आटोक्यात आला नाही तर ही परिस्थिती आणखी बिकट होईल. त्यामुळे प्रकल्पांच्या विलंबाचा काळ आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
एमएमआरडीएला भुर्दंड
या विलंबासाठी एमएमआरडीए किंवा कंत्राटदारांचा दोष नाही; परंतु कामास विलंब झाल्यामुळे भाववाढ होणार असून करारातील तरतुदींनुसार हा भुर्दंड एमएमआरडीआला सोसावा लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्याचे वातावरण अनिश्चिततेचे आहे. त्यामुळे प्रकल्प विलंब आणि खर्चवाढ याबाबत ठोस अंदाज कुणालाही व्यक्त करता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मजुरांना घरवापसीचे वेध
एमएमआरडीएच्या कंत्राटदारांच्या लेबर कॅम्पमध्ये ११ हजार मजुरांची फौज असली तरी आपल्या बांधवांची घरवापसी बघून त्यांनाही घराचे वेध लागले आहेत; पण परतीच्या प्रवासात कोरोनाची लागण होऊ शकते, असे सांगत कंत्राटदार त्यांची समजूत काढण्याच्या प्रयत्नात असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. लॉकडाउनच्या काळातील जेवण, औषधोपचार, तपासण्या आणि अन्य खर्च तूर्त कंत्राटदारांनी केला असला तरी त्याची भरपाई एमएमआरडीएला द्यायची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: CoronaVirus News in Mumbai: Metro will not run on the new route in Mumbai this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.