CoronaVirus News in Mumbai : एमएमआरडीएने दिली पालिकेला तेरा हजार घरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 05:12 AM2020-05-17T05:12:50+5:302020-05-17T05:14:31+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : देशभरात सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण हे मुंबईमध्ये सापडत आहेत. दररोज शेकडो संशयित रुग्णांनाही उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येत आहे.

CoronaVirus News in Mumbai: MMRDA gives thirteen thousand houses to the municipality | CoronaVirus News in Mumbai : एमएमआरडीएने दिली पालिकेला तेरा हजार घरे

CoronaVirus News in Mumbai : एमएमआरडीएने दिली पालिकेला तेरा हजार घरे

googlenewsNext

मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता एमएमआरडीएने प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी तयार केलेली तेरा हजार घरे महापालिकेला दिली आहेत. यामुळे या घरांचा वापर रुग्णांच्या विलगीकरणासाठी किंवा उपचारांसाठी करता येणार आहे.
देशभरात सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण हे मुंबईमध्ये सापडत आहेत. दररोज शेकडो संशयित रुग्णांनाही उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येत आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने हॉस्पिटलमधील खाटा कमी पडत आहेत. खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने काही खासगी हॉस्पिटलही सील करण्यात आली आहेत. अशा वेळी एमएमआरडीएने दिलेल्या तेरा हजार घरांमुळे महापालिकेला दिलासा मिळणार आहे.
एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनुसार प्रकल्पबाधितांसाठी ही तेरा हजार घरे तयार करण्यात आली होती. मात्र ही घरे अद्याप प्रकल्पबाधितांना सुपूर्द करण्यात आली नव्हती. आता कोरोनाच्या संकटकाळात ही घरे रुग्णांच्या उपचारांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या उपचारांसाठी एमएमआरडीएने बीकेसीतील मैदानामध्ये देशातील पहिले १००८ बेडचे हॉस्पिटल तयार केले आहे. हे हॉस्पिटल महापालिकेला सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासह या ठिकाणी आणखी एक हजार बेडचे हॉस्पिटल एमएमआरडीएमार्फत उभारण्यात येणार आहे. येथे गंभीर रुग्णांवर उपचार करण्यात येणार असून शंभर बेड आयसीयूचेसुद्धा असतील.

खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना आणि कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली असल्याने काही खासगी हॉस्पिटलही सील करण्यात आली आहेत. अशा वेळी एमएमआरडीएने दिलेल्या तेरा हजार घरांमुळे महापालिकेला दिलासा मिळणार आहे.

Web Title: CoronaVirus News in Mumbai: MMRDA gives thirteen thousand houses to the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.