CoronaVirus News : मुंबई मनपाने मागवले १५ हजार रेमडेसिवीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 02:40 AM2020-07-14T02:40:37+5:302020-07-14T02:41:00+5:30
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधून २२,७५६ साध्या बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे सध्या फक्त ९८८९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १७३८ आयसीयू बेड आहेत.
मुंबई : मुंबई महापालिकेने १५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मागवले असून त्यांना आतापर्यंत ६२०० इंजेक्शन मिळाले आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधून २२,७५६ साध्या बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे सध्या फक्त ९८८९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १७३८ आयसीयू बेड आहेत. त्यापैकी १५१४ बेड वापरात असून २२४ बेड रिकामे आहेत. तसेच मुंबईतील खासगी रुग्णालयांमधील ४८०० साधे बेड आहेत, त्यापैकी ३००० बेड अॅक्टिव्ह रुग्णांसाठी असून ५०० आयसीयू बेडपैकी ४०० बेड वापरात आहेत व १०० रिकामे आहेत, असे सांगून मनपा सहआयुक्त काकाणी म्हणाले, आयसीयूपैकी साधारणपणे १० टक्के रुग्णांनाच रेमडेसिवीर किंवा टॉसिलीझूमॅब इंजेक्शनची गरज आहे. त्याचा पुरेसा साठा आपल्याकडे आज उपलब्ध आहे, ही दोन्ही इंजेक्शन्स महापालिकेतील रुग्णांना मोफत दिली जात असल्याचे ते म्हणाले.