मुंबई: गेल्या दोन दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत होती. मात्र होळी आणि धुळवडीला कोरोना रुग्ण संख्या कमी झाली. देशात दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्यात मुंबईचा वाटा मोठा आहे. शहरात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितलं आहे. कुंभमेळ्याआधी कोरोनाचा विस्फोट! टिहरीत 83 तर गीता कुटीर आश्रमात 32 जण कोरोना पॉझिटिव्हगेल्या ४९ दिवसांत मुंबईत ९१ हजार कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यापैकी ७४ हजार रुग्णांमध्ये कोरोनाचं कोणतंही लक्षण नाही. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता कोरोना दबक्या पावलानं मानवी शरीरात प्रवेश करत असल्याचं दिसून येत आहे. उर्वरित १७ हजार कोरोनाबाधितांमध्ये कोरोनाची अतिशय मर्यादित लक्षणं आढळून आली आहेत.45 वर्षे झालीत म्हणून लस मिळणार नाही; 'ही' जन्मतारखेची अट बंधनकारक; जाणून घ्या...कोरोनाची लक्षणं नसलेल्या, मात्र कोरोनाची बाधा झालेल्यांना घरीच विलगीकरणात राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी त्यांच्या हातावर शिक्का मारला जात आहे. अशा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी आढळून आल्यास त्यांच्यावर एफआयआर नोंदवला जाईल. त्यांना अटकही केली जाऊ शकते.मुंबईतील ९९०० हॉस्पिटल बेड्स भरले आहेत. तर या आठवड्यात ४००० बेड्सची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येईल. लॉकडाऊन करण्याची सरकारची इच्छा नाही. लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केल्यास लॉकडाऊनची गरज भासणार नाही, असं मत चहल यांनी व्यक्त केलं. मुंबईत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या नियंत्रणात आहे. शहरात कमीत कमी निर्बंध लागू आहेत, असं चहल यांनी सांगितलं.
Coronavirus News: चिंता वाढली! कोरोना आता 'दबक्या' पावलांनी येतोय; आधीपेक्षा जास्त धोकादायक ठरतोय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 2:51 PM