CoronaVirus News in Mumbai : निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक सुविधा द्या - मार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 02:29 AM2020-05-20T02:29:21+5:302020-05-20T02:29:45+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : निवासी डॉक्टरांना विमा संरक्षण द्यावे, निवासी डॉक्टरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास एक कोटी रुपये सन्मान राशी द्यावी, कोरोनादरम्यान मृत्यूपश्चात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, घरातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी द्यावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

CoronaVirus News in Mumbai: Provide necessary facilities for resident doctors | CoronaVirus News in Mumbai : निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक सुविधा द्या - मार्ड

CoronaVirus News in Mumbai : निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक सुविधा द्या - मार्ड

Next

मुंबई : कोरोनाबाधितांची सेवा करताना निवासी डॉक्टरांनाही ससंर्ग होत आहे. त्यांना आवश्यक सुविधा द्या, अशी मागणी मार्डने केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रश्न, समस्या व त्यांचे निरसन करण्यासाठी संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य, डॉ. तात्याराव लहाने, टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, डॉ. हेमंत देशमुख व मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांच्या मार्ड अध्यक्षांची बैठक जे. जे.त पार पडली. यावेळी विविध रुग्णालयाच्या मार्ड संघटनांनी मागण्यांचे निवेदन दिले. निवासी डॉक्टरांना विमा संरक्षण द्यावे, निवासी डॉक्टरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास एक कोटी रुपये सन्मान राशी द्यावी, कोरोनादरम्यान मृत्यूपश्चात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, घरातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी द्यावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

Web Title: CoronaVirus News in Mumbai: Provide necessary facilities for resident doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.