मुंबई : राज्यातील सर्व कारागृहांतील कोरोनाबाधित कैदी व अंडरट्रायल्सची संख्या व कारागृहात उपलब्ध असलेल्या सुविधा, स्वच्छतेबाबत माहिती द्या. तसेच या अहवालात कोरोनाबधितांची नावे व इतर माहिती नमूद करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.आर्थर रोड कारागृहात दोन आठवड्यांपूर्वी १५४ कैदी, २६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज् (पीयूसीएल) या एनजीओने गेल्या आठवड्यात यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. कोरोनाबाधित कैद्यांच्या व अंडरट्रायल्सच्या कुटुंबीयांना व त्यांच्या वकिलांना त्यांच्या प्रकृतीची माहिती द्यावी. कैद्यांना मोफत पीपीई किट मिळावेत, आदी मागण्या एनजीओने केल्या. या याचिकेसह आणखी दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयाने या याचिकांवर राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश देत याचिकांवरील सुनावणी तहकूब केली.
CoronaVirus News in Mumbai :कोरोनाबाधित कैद्यांची माहिती सादर करा- उच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 5:16 AM