Join us

CoronaVirus News in Mumbai : कोरोना रुग्णाच्या मृतदेहाचे ‘स्वॅब’ घेण्याचा प्रोटोकॉल नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 6:44 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : दहिसरमध्ये बेस्टच्या उपअभियंत्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना तपासणाºया पॅनलवरील डॉक्टरने ते कोरोना संशयित असल्याचा उल्लेख करीत मृत्यू प्रमाणपत्र तयार केले.

- गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई: दहशतवादविरोधी पथकाच्या हेड कॉन्स्टेबलच्या मृत्यूनंतर झालेल्या त्यांच्या कोरोना चाचणीत ते पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले. मात्र दहिसरमधील कोरोना संशयित असलेल्या ‘बेस्ट’च्या अधिकाऱ्याची कोरोना चाचणी का करण्यात आली नाही? याबाबत विचारणा केली असता मृतदेहाचे ‘स्वॅब’ घेण्याचा अथवा दोन तासांहून अधिक काळ मृतदेह बाहेर ठेवण्याचा प्रोटोकॉलच नाही, अशी माहिती महापालिकेच्या आर उत्तर विभागाच्या वैद्यकीय अधिकाºयाने दिली. त्यामुळे दोन कोविड योद्ध्यांना असमान वागणूक का दिली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.दहिसरमध्ये बेस्टच्या उपअभियंत्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना तपासणाºया पॅनलवरील डॉक्टरने ते कोरोना संशयित असल्याचा उल्लेख करीत मृत्यू प्रमाणपत्र तयार केले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांची कोरोना चाचणी केली का गेली नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला तेव्हा मृतदेहाचे स्वॅब घेण्याचा प्रोटोकॉलच नाही; तसेच असा मृतदेह दोन तासांवर बाहेर ठेवणेही प्रोटोकॉलमध्ये बसत नसल्याचे पालिकेच्या आर उत्तर विभागाचे वैद्यकीय अधिकारी अविनाश वायदंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मात्र मंगळवारी दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) हवालदार दिलीप पाटील यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची मरणोत्तर कोरोना चाचणी केली गेली. त्यांच्या अहवालात त्यांना कोरोना झाल्याचे उघड झाल्याचे एटीएसने अधिकृतरीत्या जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे जर पाटील यांची मृत्यूनंतर चाचणी करता आली तर बेस्ट अभियंत्याच्या वेळी प्रोटोकॉल का बदलला, असा सवाल आता उपस्थित होत आहे.दोघेही कोविड योद्ध्ये असूनही त्यांना असमान वागणूक दिली जात असल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांकडून या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेची हेल्पलाइन १९१६ ही दहा तास रुग्णवाहिका पुरविण्यास असमर्थ ठरल्याने धारावीसारख्या कोरोनाने थैमान घातलेल्या जीवघेण्या परिसरात कार्यरत बेस्ट अभियंत्याचा मृतदेह घरातच फुगून त्याची दुरवस्था झाली. अखेर नाइलाजास्तव कुटुंबीयांनाच खासगी डॉक्टरच्या मदतीने कोरोना किट मागवून त्याची विल्हेवाट लावावी लागली.पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह!बेस्टचा तो अधिकारी कोरोना संशयित असल्याने त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणी मंगळवारी करण्यात आली. त्या अहवालात त्यांना कोरोना झाल्याचे उघड झाले. त्यामुळे पालिकेने ते राहत असलेल्या इमारतीचे निर्जंतुकीकरण करीत रहिवाशांना क्वॉरंटाइन केले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस