CoronaVirus News in Mumbai: राज्यात अडकलेल्या नागरिकांसाठी नाशिक-भोपाळ दरम्यान ट्रेन धावली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 05:44 AM2020-05-02T05:44:36+5:302020-05-02T05:44:49+5:30

शुक्रवारी लिंगमपल्ली ते हटिया, अलुवा ते भुवनेश्वर, जयपुर ते पटना, कोटा- हटियादरम्यान ट्रेन चालविल्या.

CoronaVirus News in Mumbai: Train ran between Nashik-Bhopal for stranded citizens in the state | CoronaVirus News in Mumbai: राज्यात अडकलेल्या नागरिकांसाठी नाशिक-भोपाळ दरम्यान ट्रेन धावली

CoronaVirus News in Mumbai: राज्यात अडकलेल्या नागरिकांसाठी नाशिक-भोपाळ दरम्यान ट्रेन धावली

Next

मुंबई : वेगवेगळ््या राज्यांमध्ये अडकलेल्या मजूर, यात्रेकरू, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना आंतरराज्य प्रवासासाठी परवानगी केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलीे. या अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे प्रशासनाने ‘श्रमिक विशेष’ ट्रेन सेवा सुरु केल्याने दिलासा मिळाला आहे. राज्यातून नाशिक-भोपाळ या मार्गावरून शुक्रवारी रात्री ९.३० वाजता ट्रेन सुटली. शुक्रवारी लिंगमपल्ली ते हटिया, अलुवा ते भुवनेश्वर, जयपुर ते पटना, कोटा- हटियादरम्यान ट्रेन चालविल्या.
श्रमिक ट्रेन या पॉईण्ट टु पॉईण्ट धावणार आहेत. प्रवासापूर्वी प्रत्येक प्रवाशांची चाचणी होईल. कोरोनाची लक्षणे नसल्याची खात्री करूनच त्यांना प्रवासाची मुभा दिली जाईल. मूळ गावी पोहोचलेल्या मजुरांच्या आरोग्याची तपासणीकरून त्यांचे घरातच किंवा गरजेनुसार आरोग्यसेवा केंद्रात ते विलगीकरण होईल.
एका ट्रेनमधून फक्त हजार लोकांनाच प्रवास करता येणार आहे. गावी जाणाऱ्यांनी सविस्तर माहिती भरुन (नाव,पत्ता, मोबाईल, आधार क्रमांक, गंतव्य स्थान) एक अर्ज स्थानिक पोलिस स्टेशनला जमा करावा. राज्य शासनाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार रजिस्टर असलेल्या परप्रातियांना स्थानकात नेले जाणार असून ट्रेनमध्ये बसविण्यात येणार आहे.
मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याआधी त्या राज्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड.अनिल परब यांनी दिली.
>बसेसही सज्ज : एसटी महामंडळाच्या सुमारे १० हजार तयार आहेत. खासगी बस गाड्यांचीही मदत घेण्याचा विचार सुरु असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक आयोजित केली आहे.

Web Title: CoronaVirus News in Mumbai: Train ran between Nashik-Bhopal for stranded citizens in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.