मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांचाही शोध घेऊन खबरदारी म्हणून त्यांना होम क्वारंटाईन केले जात आहे. अशा होम क्वारंटाईन लोकांचा आकडा १५ एप्रिलच्या(४३,२४९) तुलनेत मे महिन्यात अधिक असल्याचे आढळून आले आहे.
आतापर्यंत दोन लाख ३४ हजार मुंबईकरांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. ६ एप्रिलपर्यंत दहा हजार ९६८ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. १७ एप्रिलपर्यंत हा आकडा ५३ हजार ११८ वर पोहचला. म्हणजेच ११ दिवसांत ३८४ टक्के वाढ झाली. हाय रिस्क गटातील व्यक्तीला संसर्गाचा धोका अधिक असल्याने त्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितले जाते. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये गरजेनुसार पाठवले जाते.
रुग्ण राहत असलेल्या इमारतीमधील रहिवाशांना १४ दिवस बाहेर पडण्यास मनाई केली जाते, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.