CoronaVirus News : मुंबईचा मृत्युदर ५.४० टक्के, चाचण्या वाढवा, फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 04:59 AM2020-08-19T04:59:37+5:302020-08-19T05:00:05+5:30

मुंबईत चाचण्या वाढविण्याची गरज असल्याचे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले.

CoronaVirus News :Mumbai's mortality rate 5.40%, increase tests, Fadnavis's letter to the Chief Minister | CoronaVirus News : मुंबईचा मृत्युदर ५.४० टक्के, चाचण्या वाढवा, फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

CoronaVirus News : मुंबईचा मृत्युदर ५.४० टक्के, चाचण्या वाढवा, फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Next

मुंबई : कोरोनाचा देशाचा मृत्युदर १.९२ टक्क्यांवर आहे. मात्र, आॅगस्टमधील १७ दिवसांत मुंबईचा मृत्युदर ५.४० टक्क्यांवर गेला आहे. मुंबईत चाचण्या वाढविण्याची गरज असल्याचे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले.
मुंबईत सातत्याने आग्रह करूनहीचाचण्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचे कारण आता कळेनासे झाले आहे. जुलै महिन्यात मुंबईमध्ये प्रतिदिन ६ हजार ५७४ चाचण्या करण्यात आल्या आणि या महिन्याचा मृत्युदर ४.९१ टक्के इतका होता. आॅगस्टमध्ये आतापर्यंत दररोज ७ हजार ००९ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईची एकूणच लोकसंख्या पाहता प्रतिदिन ७ हजार चाचण्या ही संख्या अतिशय कमी आहे. देशाचा मृत्यूदर आता १.९२ टक्क्यांवर आला आहे. असे असताना मुंबईचा मृत्युदर सातत्याने ५ टक्क्यांवर असणे हे अतिशय चिंताजनक असल्याचे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.
एकीकडे संसर्गाचे प्रमाण अधिक आणि दुसरीकडे सातत्याने वाढणारा मृत्युदर पाहता चाचण्यांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करणे, रुग्ण ओळखणे, त्यातून विलगीकरण आणि अन्य नागरिकांना सुरक्षित ठेवणे हा एकमात्र पर्याय उपलब्ध असल्याने मुंबईत चाचण्या वाढविण्याची नितांत गरज आहे, असे फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.

Web Title: CoronaVirus News :Mumbai's mortality rate 5.40%, increase tests, Fadnavis's letter to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.