CoronaVirus News: महापालिकेचे अतिजोखमीच्या व्यक्तींवर लक्ष; तांत्रिक अडचणी कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 01:50 AM2020-10-05T01:50:09+5:302020-10-05T01:50:18+5:30

अ‍ॅप अद्ययावत करण्याची गरज : जनजागृती मोहीम कासवगतीने सुरू

CoronaVirus News: Municipal Corporation focuses on high risk individuals; Technical difficulties persist | CoronaVirus News: महापालिकेचे अतिजोखमीच्या व्यक्तींवर लक्ष; तांत्रिक अडचणी कायम

CoronaVirus News: महापालिकेचे अतिजोखमीच्या व्यक्तींवर लक्ष; तांत्रिक अडचणी कायम

Next

- स्नेहा मोरे

मुंबई : महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत आरोग्य साक्षरता आणि सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. या मोहिमेच्या माध्यमातून कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी वेळीच अतिजोखमीच्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनासमोर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. या मोहिमेदरम्यान पालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये असणारे माहिती तंत्रज्ञानाचे अज्ञान आणि सर्व्हरच्या समस्येमुळे माहिती अ‍ॅपमध्ये फिड करताना येणाºया अडचणींमुळे ही मोहीम कासवगतीने सुरू असल्याचे दिसून आले.

अ‍ॅपमध्ये माहिती आॅफलाइन भरून नेटवर्कमध्ये आल्यानंतर सर्व माहिती पाठविण्याची सुविधा अ‍ॅपमध्ये दिली आहे. परंतु आॅफलाइन जमा केलेली माहिती पाठविण्यात अनेक अडचणी येत असल्याने अनेकदा ही माहिती नष्ट होते. त्यामुळे केलेली मेहनत वाया जाते. कुटुंबानुसार माहिती भरायला लागते. संपूर्ण कुटुंबाची माहिती भरल्यानंतर माहिती जतन होते, कधी कधी होत नाही. मग पुन्हा सर्व माहिती भरावी लागते. आमच्या विभागात पावणेदोन लाख घरे असून, चाळीस हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. परंतु सॉफ्टवेअरमध्ये यातील दहा हजार घरांची माहिती भरून झालेली आहे. आरोग्य कर्मचारी यामुळे वैतागले असल्याचे मुंबई पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. सीआरएस तत्त्वावर राज्य शासनाने दिलेल्या या अ‍ॅपच्या माध्यमातून उपक्रमाचे काम सुरू आहे. राज्यभरात सर्वत्र ही मोहीम सुरू आहे. त्यामुळे काही वेळा अ‍ॅपमध्ये माहिती भरण्यास अडचण निर्माण होते. त्यावर पर्याय म्हणून लेखी नोंद करून नंतर आॅनलाइन भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. याबाबत पालिकेच्या उपकार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.

‘ताण वाढतो आहे’
स्वयंसेवक शौनक पारिख यांनी सांगितले, हा उपक्रम स्तुत्य असून, यामुळे अतिजोखमीच्या व्यक्ती शोधण्यात मदत होते आहे. परंतु, अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणींमुळे स्वयंसेवकाचा ताण वाढत आहे. एकाच प्रकारची माहिती दोन वेळा भरावी लागत आहे. अ‍ॅपमध्ये बदल केल्यास हे काम अधिक सोपे होईल. यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

Web Title: CoronaVirus News: Municipal Corporation focuses on high risk individuals; Technical difficulties persist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.