CoronaVirus News in Navi Mumbai : कोरोनाचे थैमान रोखण्याचे आव्हान; नवी मुंबई महापालिकेसह पोलिसांचीही कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 05:43 AM2020-05-17T05:43:49+5:302020-05-17T05:44:05+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : नवी मुंबईत प्रतिदिन सरासरी ७० रुग्ण वाढत आहेत. जे जे रुग्णालयातून अहवाल आले की पॉझिटिव्ह असलेल्यांना रुग्णालयात भरती करताना आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागते.

CoronaVirus News in Navi Mumbai: Corona's challenge to prevent thymus; Test of Navi Mumbai Municipal Corporation and also the police | CoronaVirus News in Navi Mumbai : कोरोनाचे थैमान रोखण्याचे आव्हान; नवी मुंबई महापालिकेसह पोलिसांचीही कसोटी

CoronaVirus News in Navi Mumbai : कोरोनाचे थैमान रोखण्याचे आव्हान; नवी मुंबई महापालिकेसह पोलिसांचीही कसोटी

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात एक हजार रुणांचा टप्पा पूर्ण झाला आहे. कोरोनाचे थैमान रोखण्याचे आव्हान पालिकेसह पोलिसांसमोरही उभे राहिले आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांना तासन्तास रुग्णवाहिकेची वाट पाहावी लागत आहे. रुग्णांच्या घरात व इमारतीमध्ये औषध फवारणीसाठी वेळेवर कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. नियम तोडणाऱ्या ठरावीक नागरिकांचा फटका सर्व शहरवासीयांना बसत आहे. यापुढे प्रत्येक व्यक्तीने स्वयंशिस्त पाळून काळजी घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबईत प्रतिदिन सरासरी ७० रुग्ण वाढत आहेत. जे जे रुग्णालयातून अहवाल आले की पॉझिटिव्ह असलेल्यांना रुग्णालयात भरती करताना आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. पालिकेकडे सद्य:स्थितीमध्ये १७ रुग्णवाहिका असून, प्रत्येक रुग्णवाहिकेतून रोज चार ते पाच रुग्ण घेऊन जावे लागत आहेत. तुर्भेमध्ये शुक्रवारी एकाला कोरोनाची लागण झाली. तेथील लोकप्रतिनिधीनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सायंकाळी रुग्णवाहिका उपलब्ध झाली. सीवूडमध्ये काही दिवसांपूर्वी डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर तीन तास रुग्णवाहिका मिळाली नाही. कोरोनाचा अहवाल पाच दिवसानंतर प्राप्त झाला होता. ऐरोली सेक्टर १६मध्ये बेस्ट कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यानंतर तीन दिवस त्याचा अहवाल प्राप्त झाला नव्हता. नेरुळ सेक्टर १०मध्ये कोरोना रुग्णास रुग्णालयात दाखल करण्यास तो राहत असलेल्या घरात व सोसायटीमध्ये औषध फवारणी करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नव्हते. कोरोनाची भीती व अपुरे साहित्य असल्यामुळे कामगारांनी रुग्णाच्या घरात औषध फवारणीसाठी जाण्यास नकार देण्यास सुरुवात केली आहे. तर वाशीमध्ये रुग्ण सापडलेल्या इमारतीमध्ये रहिवाशांनी स्वत:च औषध फवारणी केली.
आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांनाही लागण होत आहे. यामुळे उपचार करणाºयांची संख्या रोडावत आहे. यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढला आहे. सिडको प्रदर्शन केंद्र्रामध्ये ११०० बेडचे रुग्णालय तयार केले जात आहे; परंतु उपचार करण्यासाठी व औषध फवारणीसह रुग्णवाहिका उपलब्ध करण्यासाठीची यंत्रणा अपुरी पडत आहे. आता नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून, आत्मनिर्भर होऊन काळजी घेतली पाहिजे.

पोलिसांची
दिवसरात्र कसरत
नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात ४,१९८ पोलीस कर्मचारी व ४५१ अधिकारी दोन महिन्यांपासून अविश्रांत मेहनत घेत आहेत. कायदा व सुव्यवस्था कायम राखतानाच गरजूंना मदत करण्याचे कामही पोलीस करत आहेत. ५५ वर्षांवरील कर्मचाºयांना सुट्टी देण्यात आली असून, ५० वर्षांवरील कर्मचाºयांना फिल्डवरील काम देण्यात येत आहे.

करंजाची पुनरावृत्ती
होऊ शकते
उरण तालुक्यातील करंजा गावात एक व्यक्तीच्या आईवडिलांचे निधन झाले. त्या व्यक्तीच्या सांत्वनासाठी गावातील नागरिक गेले. सदर व्यक्तीला कोरोना झाल्याने त्याचा प्रादुर्भाव गावातील इतर नागरिकांना झाला. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त नागरिकांना लागण झाली आहे. नवी मुंबईमध्येही काळजी न घेतल्यास अशीच स्थिती होण्याची भीती व्यक्त होत आहे.

लक्षणे दिसली तरच तपासणी
यापूर्वी एखादा रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील किमान पाच जणांची चाचणी केली जात होती. तसेच सर्वांना क्वारंटाइन केले जात होते; परंतु आता रुग्ण सापडलेल्या घरातील सदस्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली तरच चाचणी केली जाणार आहे. यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वत:ची काळजी स्वत: घेणे आवश्यक आहे.

Web Title: CoronaVirus News in Navi Mumbai: Corona's challenge to prevent thymus; Test of Navi Mumbai Municipal Corporation and also the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.