CoronaVirus News: गोरेगाव, वांद्रे प., अंधेरी, चेंबूर कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 02:28 AM2021-04-04T02:28:58+5:302021-04-04T02:29:19+5:30
बाधितांच्या वाढीचा दर १.५४ टक्के, सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक
मुंबई : कोरोनाचा संसर्ग मुंबईत झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे दैनंदिन रुग्णवाढीचा सरासरी दर आता १.५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, गोरेगाव, वांद्रे पश्चिम, अंधेरी पूर्व- पश्चिम आणि चेंबूर असे काही विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागले आहेत, तर पश्चिम उपनगरात अंधेरी ते बोरीवलीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दररोज वाढत आहे. दररोज सरासरी आठ ते नऊ हजार बाधित रुग्णांची नोंद होत आहे. सुरुवातीला चेंबूर, गोवंडी, वांद्रे या काही विभागांमध्ये रुग्ण वाढ दिसून येत होती.
मात्र, आता सर्वच विभागांमध्ये रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शनिवारी ९०९० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर आता मुंबईत ६२ हजार १८७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.
मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी कमी होऊन ४४ दिवसांवर आला आहे. गोरेगाव विभागात हेच प्रमाण ३३ दिवस, वांद्रे पश्चिम येथे ३४ दिवस, अंधेरी पूर्व- जोगेश्वरी येथे ३७ दिवसांमध्ये, चेंबूर- गोवंडी विभागात ३७ दिवस आणि अंधेरी प. येथे ३८ दिवसांमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होत असल्याचे आढळून आले आहे. दररोज सुमारे ४२ ते ४५ हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.
पाचहून अधिक बाधित रुग्ण आढळल्यावर
संपूर्ण इमारत सील करण्यात येते. सील
करण्यात आलेल्या सर्वाधिक १६७ इमारती
अंधेरी पश्चिम या विभागात आहेत. त्यापाठोपाठ
परळ विभागात ८३, ग्रँट रोड- मलबार हिल
येथे ७९, चेंबूर - गोवंडी परिसरात ५९
इमारती सील आहेत.
या विभागात सर्वाधिक वाढ
विभाग दैनंदिन रुग्ण वाढ
पी दक्षिण - गोरेगाव २.१४
एच पश्चिम - वांद्रे पश्चिम २.०९
के पूर्व - अंधेरी, जोगेश्वरी १.९०
एम पश्चिम - चेंबूर १.९०
के पश्चिम - अंधेरी १.८२
एफ उत्तर - माटुंगा-सायन १.७९
पी उत्तर - मालाड १.६४
आर दक्षिण - कांदिवली १.६४
सर्वाधिक सक्रिय रुग्ण
के पश्चिम - अंधेरी प. ४८४९
के पूर्व - अंधेरी पूर्व, जोगेश्वरी ४१७१
आर मध्य ३५४९
आर दक्षिण ३४८४
पी उत्तर ३४२३