CoronaVirus News: कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा दोनशेच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 05:58 AM2020-05-02T05:58:11+5:302020-05-02T05:58:34+5:30

नागरिकांसोबतचा थेट संपर्क वाढत असल्याने पोलिसांना कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत राज्यभरात २२७ कोरोनाबाधित पोलिसांची नोंद झाली.

CoronaVirus News: The number of coronated police is over two hundred | CoronaVirus News: कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा दोनशेच्या पार

CoronaVirus News: कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा दोनशेच्या पार

Next

मुंबई : राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २२७ वर पोहोचला आहे. यात ३० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर, मुंबई पोलीस दलातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा शंभरी पार गेल्याची माहिती समोर येत आहे. राज्यभरात विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत ८७,३९१ गुन्हे दाखल आहेत. अवैध वाहतूक प्रकरणी १ हजार २४० गुन्हे नोंदवून १७,६३२ जणांना अटक करण्यात आली.
या कारवाईबरोबरच विविध बंदोबस्ताची जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यामुळे नागरिकांसोबतचा थेट संपर्क वाढत असल्याने पोलिसांना कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत राज्यभरात २२७ कोरोनाबाधित पोलिसांची नोंद झाली. यापैकी ८ अधिकारी, २२ पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत.
>वडाळा पोलीस ठाणे केले प्रतिबंधित
वडाळा पोलीस ठाण्यातील २६ जणांची चाचणी गुरुवारी घेण्यात आली. यातील नऊ अंमलदारांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे संपूर्ण पोलीस ठाणेच प्रतिबंधित करण्यात आले आहे. एकत्र जेवल्याने इतक्या जणांना एकत्रित बाधा झाली, अशा अफवा आहेत.

Web Title: CoronaVirus News: The number of coronated police is over two hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.