Join us

CoronaVirus News: कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा दोनशेच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 5:58 AM

नागरिकांसोबतचा थेट संपर्क वाढत असल्याने पोलिसांना कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत राज्यभरात २२७ कोरोनाबाधित पोलिसांची नोंद झाली.

मुंबई : राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २२७ वर पोहोचला आहे. यात ३० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर, मुंबई पोलीस दलातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा शंभरी पार गेल्याची माहिती समोर येत आहे. राज्यभरात विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत ८७,३९१ गुन्हे दाखल आहेत. अवैध वाहतूक प्रकरणी १ हजार २४० गुन्हे नोंदवून १७,६३२ जणांना अटक करण्यात आली.या कारवाईबरोबरच विविध बंदोबस्ताची जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यामुळे नागरिकांसोबतचा थेट संपर्क वाढत असल्याने पोलिसांना कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत राज्यभरात २२७ कोरोनाबाधित पोलिसांची नोंद झाली. यापैकी ८ अधिकारी, २२ पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत.>वडाळा पोलीस ठाणे केले प्रतिबंधितवडाळा पोलीस ठाण्यातील २६ जणांची चाचणी गुरुवारी घेण्यात आली. यातील नऊ अंमलदारांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे संपूर्ण पोलीस ठाणेच प्रतिबंधित करण्यात आले आहे. एकत्र जेवल्याने इतक्या जणांना एकत्रित बाधा झाली, अशा अफवा आहेत.

टॅग्स :पोलिसकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस